Sunday, May 19, 2024
Homeआंबेगावआमचे आदर्श, भारतीय संविधान – प्रा.अजित अभ्यंकर

आमचे आदर्श, भारतीय संविधान – प्रा.अजित अभ्यंकर

घोडेगाव : आदिवासी सेवक शंकरराव विठू केंगले यांचे आंबेगाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी विशेष योगदान आहे. ज्ञविशेषतः आदिवासी समुदायासाठी, आदिवासी भागासाठी त्यांनी केलेले आत्मभानाचे काम हे अत्यंत महत्वपूर्ण होते. त्यांनी दिलेले आदिवासी प्रश्नांवरचे लढे हे सतत प्रेरणा देणारे ठरावे, यासाठी आदिवासी सेवक शंकरराव विठू केंगले स्मृती पुरस्कार, अखिल भारतीय किसान सभा, आंबेगाव तालुका समितीच्या वतीने सन २०२१ पासून सुरु केला आहे. Our Ideal, Indian Constitution – Prof. Ajit Abhyankar

यावर्षीचा, सन २०२३ चा स्मृती पुरस्कार हा जेष्ठ कामगार नेते कॉ.रामकृष्ण बोऱ्हाडे व सामाजिक कार्यकर्त्या निसर्गवासी श्रीम. बबाबाई श्रावण केंगले यांना देण्यात आला. बबाबाई केंगले यांचा पुरस्कार त्यांच्या वतीने गणपत केंगले, व लिलाबाई मेमाणे यांनी स्वीकारला. 

यावेळी शंकर विठू केंगले यांच्या समवेत काम केलेल्या आणि विविध आंदोलनात सहभाग घेतलेल्या वीस जेष्ठ नागरिकांचा देखील सत्कार करण्यात आला. शंकर विठू केंगले यांच्या पत्नी श्रीमती पार्वताबाई केंगले यांचाही विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.  

यावेळी आयोजित करण्यात आलेल्या स्मृती व्याख्यानामध्ये प्रा. अजित अभ्यंकर यांनी ‘भारतीय संविधान, लोकशाही आणि आजची आव्हाने’ या विषयावर मांडणी केली. यावेळी बोलताना ते म्हटले, कि “भारतीय संविधान हे आपले आदर्श असुन, भारतीय संविधानातील मुल्ये हि आपल्याला दिशादर्शक आणि प्रगतशील समाजाकडे घेऊन जाणारी आहेत.पण अलीकडील काळात सत्ताधारी मंडळी यांनी ठरवून, भारतीय लोकशाहीचे आधारस्तंभ हे मोडकळीस आणून संविधानावर घाला घालत आहेत.भारतीय संविधान आणि लोकशाही शासन संस्था टिकवण्यासाठी या पुढील काळात सर्व शोषित घटकांची एकजूट आवश्यक आहे.” 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ कामगार नेते ऍड.बाळासाहेब बाणखिले यांनी अध्यक्षीय भाषणात शंकर विठू केंगले यांच्या कार्याचा आढावा घेऊन किसान सभा शोषणाविरुद्ध, अन्यायाविरोधात जे काम करत आहे, ते महत्वपूर्ण आहे असे नमूद केले. आंबेगाव तालुक्यामध्ये सर्व परिवर्तनवादी शक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे, असे ही यावेळी त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला शुभेच्छा किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष डॉ. अमोल वाघमारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे, माजी सभापती देवदत्त निकम, कॉंग्रेसचे अशोक काळे, ऍड.संजय बेंडे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय आढारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर, आम आदमी पार्टी चे वैभव टेमकर, मनसे चे संतोष बोऱ्हाडे, आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष तुकाराम काळे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सुरेश भोर, माजी शिक्षण संचालक तुकाराम सुपे, कावजी तिटकारे, इ. उपस्थित राहून दिल्या.  

या कार्यक्रमाला, बी.डी.काळे महाविद्यालाचे प्राचार्य प्रो.डॉ.ज्ञानेश्वर वाल्हेकर, प्रा.डॉ.हनुमंत भवारी, मोहन नंदकर, एसएफआय चे राज्य सहसचिव विलास साबळे, डॉ.विलास काळे, बुधाजी डामसे इ. उपस्थित होते.   

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कमल बांबळे, सूत्रसंचालन बाळू काठे तर आभार प्रदर्शन सुभाष भोकटे यांनी मांडले. व कार्यक्रमाचे संयोजन अखिल भारतीय किसान सभेचे अशोक पेकारी, राजू घोडे, रामदास लोहकरे, कृष्णा वडेकर, दत्ता गिरंगे, अशोक जोशी, लक्ष्मण मावळे, अर्जुन काळे, बाळू कोंढवळे, स्नेहल साबळे, रीना मुंढे, रुपाली काठे, दिपाली खामकर, सुप्रिया मते यांनी केले होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय