Thursday, May 2, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी-चिंचवड भाजपाची संघटनात्मक मोर्चेबांधणी

पिंपरी-चिंचवड भाजपाची संघटनात्मक मोर्चेबांधणी

विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प; संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांची माहिती

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक चिंचवड येथील ऑटो क्लसरमध्ये झाली. त्या माध्यमातून संघटनात्मक मोर्चेबांधणीवर भर दिला असून, भाजपा प्रणित केंद्र व राज्य सरकारच्या योजना शहरातील तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला आहे, अशी माहिती भाजपा शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी खासदार अमर साबळे, जिल्हा प्रभारी वर्षा डहाळे, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, माजी उपमहापौर हिरानानी घुले, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, दक्षिण भारत आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, सरचिटणीस विजय फुगे, राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, महिला मोर्चा शहराध्यक्षा उज्ज्वला गावडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यसमिती सदस्य उपस्थित होते.

माजी खासदार तथा पुणे जिल्हा प्रभारी अमर साबळे म्हणाले की, उज्वला योजना, मुस्लीम विधेयक, आयुष्यमान भारत योजना, देशातील ३६० जिल्ह्यात पाईपद्वारे घरोघरी गॅस वितरण, जम्मू-कश्मिरमधील ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय, एक देश एक निशान संकल्पना यामुळे जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा प्रभावशाली नेता अशी झाली आहे. भारताने कोविड महामारीच्या काळात जगभरात लस पाठवली ही अभिमानाची बाब आहे. आगामी काळात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाची ध्येय धोरणे तळागाळपर्यंत पोहोचवावीत.

आमदार उमा खापरे यांनी केंद्र आणि राज्यातील भाजपा प्रणित सरकारच्या धोरणात्मक निर्णयांचा ओहापोह केला. समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक, एसटीमध्ये महिला प्रवाशांना ५० टक्के सूट, जलजीवन मिशन, जलयुक्त शिवार, झोपडीधारकांना अडीच लाखांत घरे देण्याचा निर्णय, शेतकऱ्यांना अर्थसहाय्य, १०० रुपयांत आनंदाचा शिधा, पीएमआरडीएची निर्मिती, वारकाऱ्यांसाठी सोयीसुविधा अशा निर्णयांचा उल्लेख करीत भाजपाच्या कामगिरीबाबत नागरिकांना विश्वासात घेण्याचे आवाहन केले.

चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या आमदार अश्विनी जगताप यांनीही मनोगत व्यक्त केले. आगामी काळात पक्षाची ध्येय धोरणे आणि विकासकामे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी सकारात्मक भूमिकेतून कामाला लागावे, असे आवाहन केले.

दरम्यान, कार्यसमिती दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना समर्पित करण्यात आली. तसेच, आमदार आश्विनी जगताप यांचा पोटनिवडणुकीतील विजयाबाबत, जिल्हा प्रभारीपदी निवड झालेबद्दल वर्षा डहाळे आणि विधान परिषद आमदारपदी नियुक्ती झाल्याबद्दल उमा खापरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. दिवंगत खासदार गिरीश बापट, दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांची केले. सूत्रसंचालन सरचिटणीस राजू दुर्गे यांनी, तर आभार प्रदर्शन प्रकाश जवळकर यांनी केले.

भाजपामुळेच शहराच्या विकासाला चालना : आमदार लांडगे

शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला दि. ३० मे रोजी ९ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वात देशभरात ‘विशेष जनसंपर्क अभियान’ संपन्न होत असून, जिल्हा, मंडळ, शक्तीकेंद्र आणि बूथ पातळीवर विविध कार्यक्रम व उपक्रम होणार आहेत. भारतीय जनता पार्टीच्या सत्ताकाळात शहरातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहेत. शास्तीकर माफी, पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आंद्रा, भामाआसखेड प्रकल्प, कचरा समस्या सोडवण्यासाठी वेस्ट टू एनजी आणि विविध प्रकल्प, मोशी येथील प्रस्तावित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक तसेच क्रीडा विषयक प्रकल्प साकारात भाजपा सत्ताकाळात पिंपरी-चिंचवडचा समतोल विकास केला आहे. समाविष्ट गावांना २० वर्षे विकासापासून वंचित रहावे लागेल. पण, भाजपा काळात या गावांत खऱ्या अर्थाने विकासाला चालना मिळाली.

आमदार लांडगे यांच्या अभिनंदनाचा ठराव

भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा खेळ बैलगाडा शर्यतींचा लढा १२ वर्षांनंतर यशस्वी झाला. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवरील बंदी कायमस्वरुपी उठवली. यासह आंद्रा प्रकल्पातील १०० एमएलडी पाणी शहरात दाखल झाले. त्यापैकी ५० एमएलडी पाणी पुरवठा सुरळीत सुरू झाला. शहराच्या स्थापनेपासून म्हणजे ५० वर्षांत शहरासाठी पहिला जलस्त्रोत निर्माण झाला. आमदार महेश लांडगे आणि दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सकारात्मक भूमिकेतून भारतीय जनता पार्टीच्या सत्ताकाळात महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागले. या अनुशंगाने कार्यसमिती बैठकीत आमदार लांडगे यांच्या अभिनंदनाचा ठराव चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप यांनी मांडला. त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

हे ही वाचा :

मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना उत्पन्नाची संधी; तर ग्रामपंचायतींना मिळणार तब्बल मिळणार ‘इतक्या’ लाखांचे अनुदान

Blood donation : स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला प्रतिसाद

ओबीसी आरक्षण मागणारी ‘मराठा वनवास यात्रा’ पिंपरी चिंचवड शहरात दाखल

“शासन दिव्यांगांच्या द्वारी अभियान” राज्यव्यापी अभियानाचा कसा होणार फायदा पहा !

“पर्यावरण ऱ्हासासाठी श्रीमंत देश जबाबदार!” मधुश्री व्याख्यानमालेत डॉ.सुरेश बेरी यांचे प्रतिपादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे लोकार्पण !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय