Friday, May 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडBlood donation : स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला प्रतिसाद

Blood donation : स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला प्रतिसाद

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : “रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” असे समजले जाते. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. अशा प्रसंगी तरुणाईमध्ये रक्तदानाचे (Blood Donation) महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ’ निगडी च्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती व मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त जनकल्याण रक्त केंद्र, नगर यांच्या सहकार्याने शनिवारी (दि.२७) स्वातंत्र्यवीर सावरकर सदन निगडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे हे ३४ वे वर्ष आहे.

यावेळी प्रत्येक रक्त दात्याला प्रमाणपत्र व पर्यावरण घरोघरी पुस्तक देण्यात आले. सलग ६७ वेळा रक्तदान करणारे उत्तम दगडु महाकाळ यांचा आज विशेष सत्कार करण्यात आला. शिबिरात एकूण छत्तीसहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.

अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे तरुणाईने अधिकाअधिक रक्तदान करण्याचे आवाहन डॉ.अविनाश वैद्य यांनी केले. या प्रसंगी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रक्तदानाचे महत्व सांगत जनजागृतीही केली.

रक्तदान शिबिराचे उद्घाटन पहिले रक्तदाते रितेश गुल्हाणे यांच्या शुभहस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिमेचे पूजनाने करण्यात आले. यावेळी के. विश्वनाथन नायर, रमेश बनगोंडे, राजेंद्र देशपांडे, डॉ. अजित जगताप, वैदेही पटवर्धन, प्रदिप पाटील आदि मान्यवर उपस्थितीत होते. भास्कर रिकामे यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्याकरिता स्वातंत्र्य सावरकर मंडळाचे कार्यकर्ते दीपक पंडित, दीपक नलावडे व शिवानंद चौगुले तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.

हे ही वाचा :

मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना उत्पन्नाची संधी; तर ग्रामपंचायतींना मिळणार तब्बल मिळणार ‘इतक्या’ लाखांचे अनुदान

जुन्नर : भरदिवसा आठवडे बाजारात तरूणीवर चाकूने भ्याड हल्ला, मदतीला आलेल्या महिलेवरही वार

“महाराष्ट्र पोलीस देशात अग्रेसर” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संघ लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाचा वाद; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

IIIT : नागपूर येथे भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय