Friday, April 26, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडसंसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाचा वाद; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाचा वाद; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

नवी दिल्ली, दि.26 : सेन्ट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट अंतर्गत तयार करण्यात आलेल्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरुन सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. 20 विरोधीपक्षांनी मोदींच्या हस्ते होणाऱ्या या कार्यक्रमाला विरोध दर्शवला आहे. या कार्यक्रमाविरोधात सुप्रीम कोर्टात जनहित याचिका देखील दाखल करण्यात आली होती. पण ही याचिका आज सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते न करता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या व्हायला हवं, तसे आदेश लोकसभा सचिवालायला देण्यात यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका अॅड. सीआर जया सुकीन यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. पण ही याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.

न्या. जे. के. माहेश्वरी आणि न्या. पी. एस. नरसिम्हा यांच्या सुट्टीकालीन कोर्टानं या जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास अनिच्छा व्यक्त केली. त्यानंतर याचिकाकर्त्यानं ही याचिका मागे घेतली.

20 विरोधीपक्षांचा उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. यामध्ये 20 विरोधीपक्षांचा समावेश आहे. यामध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (सीपीएम), डीएमके, समाजवादी पार्टी (सपा) आदी बड्या पक्षांसह इतर लहान पक्षांचा समावेश आहे. तर या कार्यक्रमाला भाजपा, शिवसेना, बसपा, बीजेडी, टीआरएस, अद्रमुक या पक्षांसह एकूण 21 पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे.

पुणे येथे रयत शिक्षण संस्था अंतर्गत 780 पदांची मेगा भरती

पुणे‌ येथे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांची भरती


पुणे येथील पोलीस दलाच्या आस्थापनेवरील विविध पदांची थेट मुलाखतीद्वारे भरती

पुणे येथे आर्मी लॉ कॉलेज अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय