Friday, April 19, 2024
Homeराष्ट्रीयएकीकडे नव्या संसदेचे उद्घाटन होत तर दुसरीकडे लोकशाहीची हत्या, दिल्लीत संतापजनक घटना

एकीकडे नव्या संसदेचे उद्घाटन होत तर दुसरीकडे लोकशाहीची हत्या, दिल्लीत संतापजनक घटना

नवी दिल्ली : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे उद्घाटन झाले. एकीकडे हा संसद भवनाचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात पार पडला तर दुसरीकडे अत्यंत संतापजनक घटना घडली. 

कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्यावर कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत, ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या अटकेसाठी गेल्या महिन्यापासून कुस्तीपटूंनी जंतर-मंतर येथे ठिय्या दिला आहे. मात्र ब्रिजभूषण यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. आज (२८ मे) कुस्तीपटूंनी नवीन संसदेसमोर महिला महापंचायतीचे आयोजन केले होते, त्याआधीच पोलिसांनी अत्यंत संतापजनकरित्या आंदोलक कुस्तीपटूंना फरफटत नेत ताब्यात घेतले. या घटनेची सर्वाच स्तरांतून निंदा केली जात आहे.

23 मे रोजी दिल्लीत इंडिया गेटवर कँडल मार्च काढल्यानंतर आज कुस्तीपटूंनी नवीन संसद भवनाकडे मोर्चा वळवला. नवीन संसद भवनाकडे आगेकूत करणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी अडवलं. यावेळी कुस्तीपटूंनी पोलिसांचे बॅरिकेड ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अनेक पैलवानांना ताब्यात घेण्यात आलं. देशाला पदक जिंकून देणाऱ्या आंदोलक कुस्तीपटूंवर अशा स्वरूपाची कारवाई ही एक प्रकारची हत्याच असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे. या घटनेमुळे वातावरण ढवळून निघाले आहे.

सर्व पैलवानांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी जंतरमंतरवरील आंदोलकांचे तंबूही उखडून टाकले. त्यांच्या खुर्च्या, तंबू आणि इतर सामान जंतरमंतरवरून हटवण्यात आले.

दरम्यान, दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलिस आयुक्त संजय अरोरा यांना पत्र लिहून WFI प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांना अटक करण्याची तसेत कुस्तीपटूंची सुटका आणि त्यांना ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

स्वाती मालीवाल म्हणाल्या, “दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटू आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केली आणि त्यांना आज जबरदस्तीने ताब्यात घेतले. हे पाहून दिल्ली महिला आयोगाला खूप दुःख झाले आहे. एका महिन्यापूर्वी, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष असताना खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर एका अल्पवयीन महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले होते. सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर, त्यांच्याविरूद्ध या प्रकरणात दोन एफआयआर नोंदवण्यात आले. त्यांच्यावर आधीच 40 चालू गुन्हेगारी खटले चालू आहेत.

हे ही वाचा :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे लोकार्पण !

मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना उत्पन्नाची संधी; तर ग्रामपंचायतींना मिळणार तब्बल मिळणार ‘इतक्या’ लाखांचे अनुदान

 वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत भरती; 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12,828 पदांसाठी भरती

 मुंबई येथे सीमेन भविष्य निर्वाह निधी संस्था अंतर्गत भरती

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत 127 पदांची भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय