Monday, September 25, 2023
Homeराष्ट्रीयपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे लोकार्पण !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे लोकार्पण !

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी ‘सेंट्रल विस्टा’ प्रकल्पांतर्गत ९७० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या नव्या संसद भवनाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ मे या दिवशी येथे केले.हवन, पूजन यांसाह धार्मिक विधींद्वारे नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी कर्नाटकातील प्रसिद्ध शृंगेरी मठाच्या पुजार्‍यांनी वैदिक मंत्रांचा उच्चार केला. यासह गणपति होमही करण्यात आला. या कार्यक्रमाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस्. जयशंकर, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थित होते.

ऐतिहासिक ‘सेंगोल’ची स्थापना !

या वेळी मंत्रोच्चारांच्या सात्त्विक स्वरांत तामिळनाडूतील शैव पुरोहितांच्या हस्ते पंतप्रधानांनी ‘सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक’ असलेला ऐतिहासिक ‘सेंगोल’चा, म्हणजेच ‘राजदंडा’चा स्वीकार केला. या वेळी पंतप्रधानांनी सेंगोलला साष्टांग दंडवत घातला. त्यानंतर हा राजदंड लोकसभेच्या अध्यक्षांच्या आसनाच्या उजव्या बाजूला स्थापित केला.

सर्वधर्मीय प्रार्थनेचे आयोजन !

या वेळी सर्वधर्मांच्या प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. विविध भाषांत ही प्रार्थना करण्यात आली.

कामगारांचा सत्कार !

या प्रसंगी नव्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाच्या बांधकामात सहभागी असलेल्या कामगारांचा सत्कार केला.

नव्या संसदेत ‘ज्ञान द्वार’, ‘शक्ती द्वार’ आणि ‘कर्म द्वार’ या ३ द्वारांचा समावेश !

नव्या संसद भवनाची इमारत त्रिकोणी आकाराची असून ती ४ मजली आहे. याचे क्षेत्रफळ ६४ सहस्र ५०० वर्ग मीटर इतके आहे. या संसद भवनाला तीन प्रवेशद्वारे आहेत. ‘ज्ञान द्वार’, ‘शक्ती द्वार’ आणि ‘कर्म द्वार’ अशी या प्रवेशद्वारांची नावे आहेत. यासह सामान्य व्यक्ती आणि महत्त्वाच्या व्यक्ती यांच्यासाठी वेगवेगळी प्रवेशद्वारे आहेत. ‘टाटा प्रोजेक्टस लिमिटेड’कडून नव्या संसद भवनाची उभारणी करण्यात आली आहे. या संसद भवनात लोकसभा, राज्यसभा यांसह भव्य संविधान कक्ष, भव्य ग्रंथालय, समिती कक्ष, भोजन कक्ष, वाहन व्यवस्था आदी सुविधा आहेत.

हे ही वाचा :

मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना उत्पन्नाची संधी; तर ग्रामपंचायतींना मिळणार तब्बल मिळणार ‘इतक्या’ लाखांचे अनुदान

 वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत भरती; 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12,828 पदांसाठी भरती

 मुंबई येथे सीमेन भविष्य निर्वाह निधी संस्था अंतर्गत भरती

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत 127 पदांची भरती

संबंधित लेख

 


लोकप्रिय