Wednesday, August 17, 2022
Homeजिल्हाएकलहरे शिवारातील फकीरवाडीत सराईत गुन्हेगार, एकाची डोक्यात गोळी घालून हत्या !

एकलहरे शिवारातील फकीरवाडीत सराईत गुन्हेगार, एकाची डोक्यात गोळी घालून हत्या !

spot_imgspot_imgspot_imgspot_img

मंचर / रवींद्र कोल्हे : मंचर पोलिस कार्यक्षेत्रातील एकलहरे शिवारातील फकिरवाडी येथे आंबेगाव तालुक्यातील सराईत गुंड ओंकार उर्फ राणा अण्णासाहेब बाणखेले (वय २३) रा.बैल बाजार मंचर याची दुचाकीवरून जात असतांना अज्ञात व्यक्तींनी डोक्यात गोळी मारून हत्या करण्यात केली. त्यात राणा जागीच ठार झाला. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज मंचर पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंचर येथील सराईत गुन्हेगार ओंकार आण्णासाहेब बाणखेले आणि प्रकाश रमेश पगारे (वय २३,रा.बैल बाजार,मंचर) हे दोघे स्कुटी या दुचाकी (एम.एच. १२ :६६६८) वरून एकलहरे शिवारातील फकीरवाडीच्या दिशेला जात असतांना अज्ञात व्यक्तींनी ओंकार उर्फ राण्या आण्णासाहेब बाणखेले याच्या डोक्यात गोळी मारली. त्यात तो जागीच ठार झाला. या नंतर हल्लेखोर पसार झाले. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात ठार झालेल्या “राणा”सोबत प्रकाश रमेश पगारे हल्लेखोर किती होते, असे मंचर पोलिसांनी प्रकाशला विचारले विचारले असता? तो नशेत असल्याने हल्लेखोर किती होते आणि नेमकं कोण होते याची माहिती उपलब्ध होत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान आंबेगाव तालुक्यात गेल्या दोन महिन्यातील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सचिन जाधव याचा रात्री आठच्या सुमारास पैशाच्या देवाणघेवाण या कारणावरून निर्घृण खून करण्यात आला. या दुर्घटनेच्या फिर्यादीची कागदावरील शाई वाळते ना वाळते तोच द्रौपदाबाई गिरे या महिलेचा खून मंचर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात झाला होता. आणि आज रविवार (दि.१ ऑगस्ट ) राजी ही तिसरी घटना घडली आहे. या पूर्वी आंबेगाव तालुक्याबाहेर उभा घटना घडत असे मात्र आता आंबेगाव तालुक्यात या घटना घडू लागल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय