Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडएका भाकरीचे वाटेकरी वाढले आहेत, मुक्त रिक्षा परवाना धोरण रद्द करावे –...

एका भाकरीचे वाटेकरी वाढले आहेत, मुक्त रिक्षा परवाना धोरण रद्द करावे – बाबा कांबळे 

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : 2017 सली महाराष्ट्र सरकारने मुक्त रिक्षा परवाना सुरू केला यामुळे पिंपरी चिंचवड पुणे व आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिक्षा विकल्या जात आहेत यामध्ये महिन्याला हजार रिक्षा नव्याने शहरांमध्ये येत आहेत पूर्वी पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाच हजार रिक्षा होत्या. आता, पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा ची संख्या 35,000 पर्यंत पोहोचली आहे, एवढ्या मोठ्या संख्येने वाढणाऱ्या रिक्षाचं प्रमाण पाहता वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत गैरसोईचे असून रिक्षा चालकांचा व्यवसाय देखील यामुळे एका भाकरी मध्ये अनेक वाटेकरी होत असून रिक्षा व्यवसाय देखील अडचणीमध्ये आला आहे, या सर्व प्रश्नांवरती सरकारने तातडीने लक्ष देऊन मुक्त रिक्षा परवाना बंद करावा. One bread share has increased, free rickshaw licensing policy should be scrapped – Baba Kamble

तसेच नवीन इलेक्ट्रिक रिक्षाला परवानगी सक्ती करावी, अन्यथा स्मार्ट सिटी मेट्रो सिटी मध्ये सर्वत्र रिक्षा रिक्षा दिसतील प्रवासी कमी आणि रिक्षा जास्त अशाप्रकारे भयानक अवस्था निर्माण होईल, ही परिस्थिती थांबवण्यासाठी सरकारने तातडीने उपयोजना करावी अशी मागणी महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केले आहे.

संत तुकाराम नगर येथील येथे नूतन रिक्षा स्टँड उद्घाटन बाबा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रिक्षा चालकांना मार्गदर्शन करताना हे मत व्यक्त केले.

बाबा कांबळे म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरांमध्ये रिक्षा स्टॅन्ड ची संख्या देखील अपुरे असून रिक्षा स्टॅन्ड नवीन रिक्षा स्टँडला देखील मंजुरी मिळणे आवश्यक आहे, याबरोबरच रिक्षा चालक-मालकांसाठी कल्याणकारी महामंडळाची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली परंतु त्याची अंमलबजावणी मात्र अद्याप झाली नाही. चालक-मालक कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी करण्यात यावी, ऑनलाइन पद्धतीने रिक्षावर खटले भरले जात आहेत हे खटले ताबडतोब रद्द करण्यात यावेत रिक्षा लावायच्या कुठे हा प्रश्न आहे. रस्त्यावर रिक्षा नाही लावणार तर रिक्षा लावणार कुठे हा गंभीर प्रश्न आहे त्यामुळे रिक्षा रस्त्यावर लावल्यास वाहतूक शाखेच्या वतीने ऑनलाईन खटले भरले जातात. रिक्षा चालकाचे उत्पन्न पाचशे रुपये परंतु खटला मात्र दीड हजार रुपयाचा भरला जातो यामुळे मात्र रिक्षाचालकांचे जगणे मुश्किल झाले आहे,

या सर्व प्रश्नावरती सरकारने तातडीने निर्णय घेतल्यास रिक्षा चालक-मालक त्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी बाबा कांबळे यांनी दिला.

यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत संघटक संतोष यादव, स्टँड अध्यक्ष प्रकाश पावर, नदीम पटेल, पांडुरंग जगताप, सुनील शेलार, पांडुरंग बनसोडे, इसाक शेख, आधी उपस्थित होते. 

संबंधित लेख

लोकप्रिय