Shivajirao Adhalrao Patil : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गुरूवारी पुण्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करत शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
शिरूर लोकसभेसाठी महायुतीकडून अधिकृत उमेदवार म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अर्ज भरला. जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे त्यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. आढळराव पाटील यांचा अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे, आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार अतुल बेनके उपस्थित होते.
दरम्यान, लांडेवाडी येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज, श्री हनुमान आणि श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेत आढळराव पाटील पुण्यात दाखल झाले. त्यावेळी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर ते डेक्कन अशी रॅली काढण्यात आली.
कोल्हेंचा खळबळजनक दावा
शिरुर लोकसभेसाठी माझ्या विरोधात मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) माझ्याविरोधात छगन भुजबळ यांना उमेदवारी देणार होते. मुख्यमंत्र्यांच्या मनात छगन भुजबळ यांच्या नावाला पसंती होती, असा खळबळजनक दावा अमोल कोल्हे यांनी केला होता. यावर आढळराव-पाटील यांनी कोल्हे बालिश विधानासाठी प्रसिद्ध आहेत. कोल्हे सकाळी उठून संजय राऊत सारखे काहीही बालिश विधानं करतात असं प्रत्यूत्तर दिले होते.
शिरूर लोकसभा मतदारसंघात (Shirur loksabha) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाने) शिवाजीराव आढळराव-पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून आफताब अन्वर मकबूल शेख मैदानात आहे.
हे ही वाचा :
मोठी बातमी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा कोणकोणत्या केल्या घोषणा !
देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहे तरी कोण ?, वाचा सविस्तर !
भुजबळांनी नकार दिल्याने, आढळराव पाटलांना उमेदवारी डॉ.अमोल कोल्हेंच्या विधानाने खळबळ
धक्कादायक : बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास
रिझर्व्ह बँकेचे पुन्हा एका बॅंकेवर निर्बंध; तुमची तर बँक नाही ना?
व्हिडिओ : भाषण सुरू असतानाच नितीन गडकरींना भोवळ
ब्रेकिंग : चीनमध्ये भीषण महापूर, 100,000 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी
नाशिक येथे पदवीधर व डिप्लोमा उत्तीर्णांसाठी अप्रेंटिस ची मोठी संधी