नागपूर, दि. २१ : आशा व गटप्रवर्तकांच्या मोर्चाला पोलिसांची दडपशाही करत कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केल्याचा आरोप संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र साठे यांनी केला आहे.
आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सीआयटीयु) तर्फे संपाचे सातव्या दिवशी खंडोबा देवस्थान सुभाष रोड येथून आशा व गटप्रवर्तक यांच्या विशाल मोर्चा काढण्याच्या प्रयत्न करण्यात आला. याची सूचना दोन दिवस आधी पोलीस विभागाला व्हाट्सअप द्वारे सूचना देण्यात आली त्यानुसार पोलीस विभागाने सुद्धा तयारी केली होती.
युनियन तर्फे पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना सर्व माहिती देऊन सरकार योग्य भूमिका घेत नाही म्हणून आम्हाला सोमवारपासून आंदोलन तीव्र करावे लागेल. आशा व गटप्रवर्तकांचा विशाल मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु त्याचे आधीच पोलीस विभागातर्फे युनियनचे अध्यक्ष राजेंद्र साठे यांचे विरुद्ध लागोपाठ दोन दिवस दोन नोटीस पाठवण्यात आल्या.
मोर्चात निघण्याचे ठिकाणी शेकडो पोलिसांच्या ताफा उभा कडून येणाऱ्या महिलांना पोलिसांनी दडपशाही करत सविधान चौकाकडे लावण्याचे काम केले.
आशा व गटप्रवर्तक युनियनच्या महासचिव प्रीती मेश्राम यांना गणेशपेठ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरसागर यांनी कार्यालयामध्ये स्थानबद्ध केले.
शेकडोंच्या संख्येने आशा वर्कर व गटप्रवर्तक संविधान चौक येथे एकत्रित होऊन प्रतीकात्मक घोषणा देत तीव्र धरणे आंदोलन केले.
तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने जिल्हा परिषद सीईओ तसेच महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन दिले. शिष्टमंडळात राजेंद्र साठे, रंजना पौनिकर, रूपलता बोंबले, पौर्णिमा पाटील, संगीता राऊत, रेखा पानतावणे, मंदा गंधारे, मोनिका गेडाम, मंदा जाधव, अंजू चोपडे, कांचन बोरकर, लक्ष्मी ठाकरे हे उपस्थित होते.