Thursday, November 21, 2024
Homeराज्यMumbai : मुंबईसह कोकणात पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरू

Mumbai : मुंबईसह कोकणात पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरू

मुंबई : राज्यात रविवार पासून मान्सूनचा पावसाची जोरदार सुरवात झाली आहे. मुंबई शहर,नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. Mumbai

कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या पावसामुळे रखडून पडल्या आहेत. मुंबईकडे येणारी मेंगलोर एक्सप्रेस देखील पावसामुळे रखडली आहे. कसाऱ्यावरून छत्रपती शिवाजी टर्मिनसला येणाऱ्या अप साईडच्या काही गाड्या या वसई दिवा मार्गे वळवण्यात आल्या आहेत. Mumbai

ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात नद्यांना महापूर आला आहे, राजापूर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने राजापूर बाजारपेठेत दुकानात चार फूट पाणी साचलं. अलिबाग, चिपळूण, दापोली तालुक्यात दमदार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी घरामध्ये पाणी शिरले आहे. या पावसाने कोकणातील शेतकरी आनंदी झाला आहे, भातशेतीची कामे सुरू झाली आहेत. Mumbai

अधिकृत पावसाच्या नोंदी / मिमी

लोणावळा (१२९), पनवेल (१२१) कर्जत (११५), मुरबाड (११५) मंडणगड (१०५), संगमेश्वर (१०२), लांजा (१०२), राजापूर (१३५), अंबोली (२३३)

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

दिवसा ढवळ्या बिबट्याचा वावर, दुचाकीस्वार थोडक्यात बचावला

मेंदू खाणाऱ्या अमिबाने 14 वर्षांच्या मुलाचा घेतला जीव

रिलसाठी स्टंट करताना दुचाकीवरून तरुणाचा भीषण अपघात, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

जगातील पहिली CNG बाईक प्रदूषणमुक्त भारत ध्येय साध्य करेल – नितीन गडकरी

नाणेघाट : इतिहासाची आणि नैसर्गिक सौंदर्याची संगमभूमी

मोठी भरती : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत भरती; पगार 64480 पर्यंत

ब्रेकिंग : मुख्याध्यापक नियुक्तीसाठी पटसंख्येचा निकष बदलणार ?

गावठी दारू तयार करणाऱ्या १० हातभट्ट्यांवर छापा; २ लाख १७ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

AIASL मार्फत विविध पदांच्या 3256 जागांसाठी मेगा भरती

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक नियमावली जाहीर

संबंधित लेख

लोकप्रिय