Navneet Rana : अमरावती लोकसभा मतदार संघातून एक महत्वाची बातमी आहे. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना भाजपकडून अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नवनीत राणा या भाजपच्या अधिकृत उमेदवार असणार आहेत. मात्र महायुतीतील घटक पक्ष असलेल्या प्रहार संघटनेचा नवनीत राणा यांना प्रचंड विरोध आहे.
गेल्या काही दिवसांपासून नवनीत राणा यांना भाजपकडून तिकीट दिले जाणार, अशी जोरदार चर्चा होती. अखेर बुधवारी भाजपकडून अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपकडून याआधी 23 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. आता तिसऱ्या यादीत नवनीत राणा यांचं एकमेव नाव जाहीर करण्यात आले आहे.
नवनीत राणा यांना विरोध
भाजपने नवनीत राणा यांच्या उमेदवारीची घोषणा केली असली तरी त्यांना महायुतीतूनच प्रखर विरोध होताना दिसत आहे. आमदार बच्चू कडू आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्याकडून राणा यांना विरोध केला जात होता.
नवनीत राणा यांना अमरावतीतून उमेदवारी दिल्यास आम्ही महायुतीतून बाहेर पडू, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला होता. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटही घेतली होती. राणा दाम्पत्याला पैशांचा माज आहे, अशी घणाघाती टीकाही बच्चू कडू यांनी केली होती.
भाजपमध्ये प्रवेश
नवनीत राणा यांना भाजपची उमेदवारी घोषित होताच त्या नागपूरसाठी रवाना झाल्या. तिथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत भाजप पक्षात प्रवेश केला.
दरम्यान, नवनीत राणा या आपल्या युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा :
मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला मोठा धक्का, वंचितने जाहीर केले आपले उमेदवार
मोठी बातमी : निवडणूक आयोगाला न्यायालयाचा मोठा दणका, अखेर ती निवडणूक रद्द
हार्दिक पांड्याने असे काही केले की, पांड्यावर लोक भडकले
शाहरूख खानच्या ‘त्या’ कृतीमुळे लोकांचा संताप
JNU : ‘जेएनयू’ विद्यार्थी संघाच्या निवडणूकीत डाव्यांचा दणदणीत विजय तर भाजप संलग्न अभाविपचा सुपडा साफ