Home ताज्या बातम्या महाकुंभ मेळ्यातील व्हायरल मोनालिसा चित्रपटात दिसणार ! प्रसिद्ध दिग्दर्शकाची ऑफर

महाकुंभ मेळ्यातील व्हायरल मोनालिसा चित्रपटात दिसणार ! प्रसिद्ध दिग्दर्शकाची ऑफर

महाकुंभ मेळ्यातून व्हायरल मोनालिसा बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण Monalisa bhosale viral from Mahakumbh Mela, will make her debut in Bollywood

Viral girl Monalisa : महाकुंभ मेळ्यात माळा विकणारी आणि आपल्या अप्रतिम सौंदर्याने सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवणारी मोनालिसा भोसले (Monalisa bhosale) अखेर बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. व्हायरल झाल्यानंतर तिच्या नशिबाने कलाटणी घेतली असून, प्रसिद्ध दिग्दर्शक सनोज मिश्रा यांच्या आगामी ‘द डायरी ऑफ मणिपूर’ या चित्रपटात तिला संधी मिळाली आहे.

मोनालिसाची व्हायरल कहाणी (Monalisa bhosale)

प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात आपल्या वडिलांना मदतीसाठी माळा विकणारी मोनालिसा अचानक सोशल मीडियावर व्हायरल झाली. तिच्या साधेपणातही असलेल्या मोहक रूपाने तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. हीच प्रसिद्धी तिच्या करिअरला मोठी चालना देणार आहे, कारण आता ती बॉलिवूडच्या चमकत्या दुनियेत पाऊल ठेवणार आहे.

सनोज मिश्रा यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका

प्रसिद्ध दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी तिच्यासाठी ‘द डायरी ऑफ मणिपूर’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका दिली आहे. याआधी त्यांनी ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. या चित्रपटात मोनालिसासोबत अनेक प्रसिद्ध कलाकार झळकणार आहेत.

हा चित्रपट लंडन, दिल्ली आणि मणिपूर येथे चित्रित केला जाणार असून, 8 फेब्रुवारीपासून लंडनमध्ये शूटिंगला सुरुवात होईल. साधारणपणे पाच महिन्यांत चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होईल आणि ऑक्टोबरमध्ये तो चित्रपटगृहांत प्रदर्शित केला जाईल.

मोठ्या कलाकारांसोबत झळकणार मोनालिसा (Monalisa in Bollywood)

या चित्रपटात मोनालिसासोबत राजकुमार राव यांचा भाऊ अमित राव मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच महेंद्र लोधी आणि मणिपूरमधील स्थानिक कलाकारही यात महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत.

20 कोटींच्या बजेटचा चित्रपट

चित्रपट दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, महाकुंभात व्हायरल झाल्यानंतर, मोनालिसाला चित्रपट ऑफर करणारा मी पहिला होतो, आम्ही आगामी चित्रपटासाठी तिला साईन केलं आहे. सनोज मिश्रा यांनी स्पष्ट केले की, हा चित्रपट तुलनेने कमी बजेटचा असून, त्यासाठी 20 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. मोनालिसासोबतचे चित्रीकरण फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार आहे.

हे ही वाचा :

चीनच्या नव्या चॅटबॉटमुळे जगभरात खळबळ, अनेक कंपन्यांचे शेअर कोसळले

कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, १७ जणांचा मृत्यू, शेकडो जखमी

गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; केंद्रीय आरोग्य टीम पुण्यात येणार

चिमुकल्याने 26 जानेवारीला सादर केला लावणीवर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

ऑनलाईन गेमिंगमुळे 17 वर्षीय तरुणीची हाताची नस कापून गळ्यावर जखम

धक्कादायक : अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करून, मारून टाकण्यासाठी दिली 100 रुपयांची सुपारी

Exit mobile version