Nagpur : ऑनलाईन गेमिंगच्या विळख्यात अडकलेल्या एका 17 वर्षीय तरुणीने स्वतःच्या हाताची नस कापून आणि गळ्यावर जखम कत्या केल्याचीरून आत्मह धक्कादायक घटना नागपूरच्या धंतोली पोलीस स्टेशन हद्दीत उघडकीस आली आहे. सोमवारी (27 जानेवारी) सकाळी तिच्या आई-वडिलांना ती खोलीत रक्ताच्या थारोळ्यात आढळून आली.
नेमके काय घडले?
पोलीस तपासानुसार, तरुणीने आत्महत्या करण्याआधी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. तपासादरम्यान असे समोर आले की, पीडित मुलगी उत्तम लिखाण करायची आणि विविध विषयांवर तिच्या भावना व्यक्त करायची. या चिठ्ठीतून आत्महत्येमागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रकरणाचा प्राथमिक तपास करताना पोलिसांनी ऑनलाईन गेमिंग टास्कमुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा संशय व्यक्त केला आहे.
तरुणी रात्री उशिरापर्यंत ऑनलाईन गेम खेळत असल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. तिच्या खोलीतून मोबाईल आणि गेमिंगशी संबंधित काही महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. या घटनेमुळे ऑनलाईन गेमिंगच्या विघातक प्रभावाबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
पालकांमध्ये चिंता वाढली
या घटनेमुळे नागपुरात पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ऑनलाईन गेमिंगमुळे तरुणाई मानसिकदृष्ट्या दबावाखाली येत असल्याचे हे आणखी एक उदाहरण आहे. काही वर्षांपूर्वी ‘ब्लू व्हेल’ सारख्या प्राणघातक खेळामुळे अनेकांनी आपले जीवन संपवले होते, आणि आता पुन्हा अशीच घटना घडल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या घटनेने ऑनलाईन गेमिंगमुळे होणाऱ्या मानसिक तणावाची आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्या ऐरणीवर आणल्या आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे, त्यांच्या मानसिक आरोग्याचा विचार करणे, आणि वेळेवर संवाद साधणे अत्यावश्यक बनले आहे. धंतोली पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
Nagpur
हे ही वाचा :
धक्कादायक : अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करून, मारून टाकण्यासाठी दिली 100 रुपयांची सुपारी
पुण्यात समलिंगी व्यक्तींना निर्जन स्थळी बोलवून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
धक्कादायक : 12 वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
‘यापेक्षा चांगलं, टपरी टाक…’, शार्क टँक इंडियाचे जज अनुपम मित्तल संतापले? वाचा काय आहे प्रकरण
ब्रेकिंग : काँग्रेस नेत्याच्या घरी ५० लाखांची चोरी; रोख रक्कम, मौल्यवान वस्तू लंपास
पुण्यात बेरोजगारीचे भीषण वास्तव ; 50 जागांसाठी 5,000 उमेदवारांची गर्दी, व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्राला ४८ जणांना ‘पोलीस पदके’ तर चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक