Home ताज्या बातम्या प्रेमात अडथळा ठरत असल्याने आईसमोर ५ वर्षांच्या चिमुरड्याचा खून, मृतदेह फेकला नदीत

प्रेमात अडथळा ठरत असल्याने आईसमोर ५ वर्षांच्या चिमुरड्याचा खून, मृतदेह फेकला नदीत

प्रेमात अडथळा ठरत असल्याने आईसमोर ५ वर्षांच्या चिमुरड्याचा खून 5-year-old boy was killed in mother it was an obstacle to love Kopargaon Crime

कोपरगाव : प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने निर्दयी प्रियकरांने पाच वर्षीय चिमुकल्याचा निर्घृण खून केल्याची संतापजनक घटना घडली आहे. यात धक्कादायक म्हणजे त्या मुलाचा खून तिच्या आईदेखतच करण्यात आला असून आईनेच पोटच्या मुलाचा मृतदेह नदीत फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. (Kopargaon Crime News)

प्रेमासाठी पोटच्या मुलाचा खून

शीतल ज्ञानेश्वर बदादे (रा. साकुरे मिग, ता. निफाड, जि. नाशिक) ही आपल्या पाच वर्षीय मुलगा कार्तिक बदादेसह प्रियकर सागर शिवाजी वाघ (रा. बोऱ्हाळे, ता. चांदवड, जि. नाशिक) सोबत राहता तालुक्यातील डोऱ्हाळे गावात शेतमजुरी करत होती. मात्र, कार्तिक हा सागरच्या प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने त्याने निर्दयीपणे त्याचा खून केला. इतकेच नव्हे, तर कार्तिकच्या आईनेही प्रियकरासाठी पोटच्या गोळ्याचा मृतदेह गोदावरी नदीत फेकून दिला. त्यानंतर हे दोघे दीड महिना फरार होते. अखेर पोलिसांनी कसून तपास करून त्यांना जेरबंद केले आहे.

ही धक्कादायक घटना २० डिसेंबर २०२४ रोजी उघडकीस आली. कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील गोदावरी नदीच्या पुलाजवळ एका लहान मुलाचा मृतदेह आढळून आला होता. प्रथमदर्शनी नरबळीचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासानंतर हा खून कौटुंबिक कारणातून झाल्याचे उघड झाले. या घटनेनंतर शीतल व सागर फरार झाले होते.

सापळा रचून तिला घेतले ताब्यात (Kopargaon Crime)

कोपरगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी विविध पथके तैनात केली होती. अखेर ८ फेब्रुवारीला शीतल तिच्या आईला भेटण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे आल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून तिला ताब्यात घेतले. चौकशीत तिने प्रियकर सागर वाघचा ठावठिकाणा सांगितला. त्यानुसार पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील एका शेतकऱ्याकडे लपून बसलेल्या सागरला सिनेस्टाईल सापळा रचून पकडले.

या अमानुष हत्याकांडाने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

हे ही वाचा :

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती, असा करा अर्ज

CIBIL स्कोअरमुळे मोडलं लग्न ; आर्थिक इतिहास पाहुन वधूपक्षाला धक्का !

अंगणवाडीत विविध पदांसाठी भरती ; मंत्री आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची माहिती

वाल्मीक कराडच्या बातम्या पाहिल्याने तरूणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण

झोमॅटो कंपनीचे नाव बदलले, आता असेल ‘हे’ नाव

धक्कादायक : ब्लूटूथच्या स्फोटामुळे १७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Exit mobile version