मावळ : कुसवली, मावळ येथे विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर_महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा मुर्ती प्राण-प्रतिष्ठापना सोहळा विधिवत गावकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या आनंदात संपन्न झाला. (Maval)
कुसवली गावाला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे, मागील २७ वर्षापासून गावात वारकरी संप्रदायाचा सप्ताह साजरा केला जात होता. या गावातील ग्रामस्थ मंडळींची एकच इच्छा होती की, गावात पांडुरंगाचे मंदिर असावे, कारण गावात पांडुरंगाचे मंदीर नव्हते.
अखेर ग्रामस्थ मंडळी आणि दानशूर व्यक्तींनी एकत्र येऊन वर्गणी गोळा केली, आणि पांडुरंगाचे मंदिर बांधावे असा निर्णय घेतला, मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी पण मंदिर उभारणीसाठी मदतीचा हात पुढे केला.आणि एक भव्य दिव्य मंदीर बांधण्यात आले, असे कुसवली येथील सामाजिक कार्यकर्ते बळीराम शिंदे यांनी सांगितले.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2025/02/1000672377-758x1024.jpg)
२८ व्या वर्षी सप्ताह हा पांडुरंगाच्या मंदीरात साजरा करण्याचे भाग्य आम्हा गावकऱ्यांना लाभले आहे. या मंदीर उभारणीत गावातील महीला, पुरुष व युवकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य व योगदान दिले. कुणी अर्थिक तर कुणी श्रमदानातून आपले योगदान दाखवले.(Maval)
मावळचे आमदार सुनिल शेळके (Sunil Shelke) यांच्या विशेष सहकार्यातुन तसेच तालुक्यातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने मंदीराचे काम पुर्ण झाले. गावकरी, आमदार साहेब व दानशूर व्यक्तींचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. असे बळीराम शिंदे म्हणाले.