Home ताज्या बातम्या बापा समोरच ४ वर्षाच्या मुलाला गाडीने चिरडले, काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर

बापा समोरच ४ वर्षाच्या मुलाला गाडीने चिरडले, काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर

बापा समोरच ४ वर्षाच्या मुलाला गाडीने चिरडले, काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर Father crushes 4-year-old boy with car in front of him, Nashik

नाशिक : नाशिक (Nashik) शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलच्या पार्किंगमध्ये बुधवारी संध्याकाळी एका चार वर्षांच्या मुलाचा कारखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मुंबई-आग्रा महामार्गालगत पाथर्डी फाटा परिसरातील हॉटेलमध्ये घडली.

बापाच्या डोळ्यासमोरच मुलाला चिरडले (Nashik)

मिळालेल्या माहितीनुसार, मृत बालक आपल्या वडिलांसोबत हॉटेलमध्ये गेला होता. त्याचे वडील व्यवसायाने चालक असून, ग्राहकांना हॉटेलमध्ये घेऊन जाण्याचे काम करतात. हॉटेलमध्ये आल्यानंतर मुलगा वडिलांच्या गाडीतून उतरून पार्किंगमध्ये खेळू लागला. त्याच वेळी, पार्किंगमध्ये आलेल्या दुसऱ्या एका कारचालकाने मुलाला चिरडले. अपघातानंतर संबंधित कारचालक घटनास्थळावरून फरार झाला.

या दुर्घटनेत मुलाला गंभीर दुखापत झाली. वडिलांनी आणि हॉटेलच्या सुरक्षा रक्षकांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हि दृष्य तुम्हाला विचलीत करू शकतात…

दरम्यान, या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फुटेजमध्ये एक कार हॉटेलच्या परिसरात प्रवेश करत असताना, अचानक एक लहान मुलगा समोर धावत जातो. तेच गाडीच्या चाकाखाली येत असल्याचे व्हिडिओ मधून दिसून येत आहे.

घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व तपास सुरू केला. सदर कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

या घटनेमुळे नाशिक शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा :

CIBIL स्कोअरमुळे मोडलं लग्न ; आर्थिक इतिहास पाहुन वधूपक्षाला धक्का !

अंगणवाडीत विविध पदांसाठी भरती ; मंत्री आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची माहिती

वाल्मीक कराडच्या बातम्या पाहिल्याने तरूणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण

झोमॅटो कंपनीचे नाव बदलले, आता असेल ‘हे’ नाव

धक्कादायक : ब्लूटूथच्या स्फोटामुळे १७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

शेतकऱ्यांसाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय ; जाणून घ्या 10 महत्त्वाच्या घोषणा

इंडिया पोस्टबाबत निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा

पुणे हादरलं | आईचे अनैतिक संबंध ; अल्पवयीन मुलाकडून तरूणाची हत्या

बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांची मोठी भरती, असा करा अर्ज

Exit mobile version