leopard Milkman Bike viral Video : राजस्थानच्या उदयपूरमधील शिल्पग्राम मेन रोडवर घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पहाटेच्या सुमारास रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली, मात्र नशीब बलवत्तर म्हणून दूधवाल्याचा जीव थोडक्यात बचावला.
ही घटना रात्री ८ च्या सुमारास घडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की, एका रहिवासी भागातील भिंतीवरून उडी मारून बिबट्या अचानक रस्त्यावर आला. त्याच वेळी भरधाव दुचाकीवरून जाणाऱ्या दूधविक्रेत्याची गाडी आणि बिबट्या यांची जोरदार धडक झाली. या जबर धडकेत दूधवाला दुचाकीसह काही अंतरापर्यंत फरपटत गेला आणि रस्त्यावर कोसळला. त्याचवेळी बिबट्यासुद्धा काही सेकंद जागेवरच पडून राहिला.
बिबट्या आणि दुचाकीस्वाराची जोरदार धडक (leopard Milkman)
अपघातात दूधवाला दुचाकीसह काही अंतरापर्यंत फरपटत गेला. यात दूधवाला हा गंभीर जखमी झाला तर बिबट्या जागेवरच काही वेळ पडून राहिला. मात्र, काही सेकंदांतच तो उठून तिथून पळून गेला. यात बिबट्यालाही काहीशी दुखापत झाल्याची त्याच्या चालण्यावरून व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यावेळी मोठ्या प्रमाणात दूध रस्त्यावर सांडले होते.
या घटनेनंतर काही नागरिक मदतीसाठी धावत आले, परंतु बिबट्याला पाहून ते घाबरले आणि मागे हटले. काही वेळाने एका गाडीच्या मदतीने दूधवाल्याला सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.
या भयानक घटनेचा संपूर्ण व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, तो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या प्रकारानंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे ही वाचा :
CIBIL स्कोअरमुळे मोडलं लग्न ; आर्थिक इतिहास पाहुन वधूपक्षाला धक्का !
अंगणवाडीत विविध पदांसाठी भरती ; मंत्री आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची माहिती
वाल्मीक कराडच्या बातम्या पाहिल्याने तरूणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण
झोमॅटो कंपनीचे नाव बदलले, आता असेल ‘हे’ नाव
धक्कादायक : ब्लूटूथच्या स्फोटामुळे १७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू