Niranjan Patnaik : भुवनेश्वरच्या नयापल्ली भागात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष निरंजन पटनायक यांच्या घरात मोठी चोरी झाली आहे. चोरांनी पटनायक यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून ५० लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू लंपास केली आहे.
26 जानेवारी रविवारी पहाटे २.४० च्या सुमारास चोरांनी पटनायक यांच्या घरात प्रवेश केला. त्यांनी दुसऱ्या मजल्यावरील बेडरूममधील लॉकर फोडून दागिने आणि पैसे चोरले. चोरीच्या वेळी पटनायक आणि त्यांच्या पत्नी पहिल्या मजल्यावर झोपले होते, तर दुसऱ्या मजल्यावर राहणारे त्यांचा मुलगा व सून घरात नव्हते. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यावरून चोरांना पकडण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.
Niranjan Patnaik यांच्याकडून घटनेबाबत चिंता
निरंजन पटनायक यांनी या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. गणतंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलिस बंदोबस्त असूनही ही चोरी झाली, हे चिंताजनक असल्याचे ते म्हणाले. नयापल्लीसारख्या उच्चभ्रू भागात झालेल्या या प्रकारामुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी पटनायक यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत कडक कारवाईचे आश्वासन दिले आहे.
हे ही वाचा :
पुण्यात बेरोजगारीचे भीषण वास्तव ; 50 जागांसाठी 5,000 उमेदवारांची गर्दी, व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्राला ४८ जणांना ‘पोलीस पदके’ तर चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक
जगातील सर्वात उंच पुलावरून धावली ‘वंदे भारत एक्सप्रेस’
Airtel, Jio आणि Vi चे कॉलिंगसाठी नवे प्लॅन लाँच, वाचा सर्वात स्वस्त प्लॅन कोणता
सामान्य नागरिकांना महागाईचा झटका ; बस, टॅक्सी आणि रिक्षाच्या प्रवास भाड्यात वाढ
पुण्यात भीषण अपघात! नियंत्रण सुटलं; डंपरखाली दोन तरुणींचा मृत्यू
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची गळा दाबून हत्या ; पतीला जन्मठेप