Home राष्ट्रीय महाराष्ट्राला ४८ जणांना ‘पोलीस पदके’ तर चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक

महाराष्ट्राला ४८ जणांना ‘पोलीस पदके’ तर चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक

महाराष्ट्राला ४८ जणांना ‘पोलीस पदके’, चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक 48 Police Medals Maharashtra President Vishtik Seva Medal

नवी दिल्ली : पोलीस पदकांची आज घोषणा झाली असून महाराष्ट्रातील एकूण 48 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’, तर 44 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक’ (MSM) जाहीर झाली आहेत. यातील 39 पोलीस पदके ‘गुणवत्तापूर्ण सेवे’साठी तर पाच पदके कारागृहात सेवा बजावणाऱ्या पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना सुधारात्मक सेवांच्या श्रेणीत गुणवत्तापूर्ण सेवेसाठी (MSM) जाहीर झाली आहेत. (President Medal)

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलीस पदके’ जाहीर करते. यावर्षी एकूण 942 ‘पोलीस पदके’ जाहीर झाली असून देशभरातील एकूण 101 पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’ (पीएसएम), 95 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि 746 पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी (एमएसएम) पोलीस पदके जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण 48 पदक मिळाली आहेत.

देशातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’ जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील चार अधिकारी –कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे.

राष्ट्रपती विशिष्ट सेवेसाठी पदक (PSM) (President Medal)

डॉ रविंद्र कुमार झिले सिंग सिंगल, -अतिरिक्त महासंचालक
श्री दत्तात्रय राजाराम कराळे- पोलिस महानिरीक्षक
श्री सुनिल बळीराम फुलारी -पोलिस महानिरीक्षक
श्री रामचंद्र बाबू केंडे – पोलिस कमांडंट
राज्यातील एकूण 44 पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदके (MSM)

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (MSM)

श्री संजय भास्कर दराडे,महानिरीक्षक
श्री वीरेंद्र मिश्रा,महानिरीक्षक
श्रीमती आरती प्रकाश सिंह, महानिरीक्षक
श्री चंद्र किशोर रामजीलाल मिना,महानिरीक्षक
श्री दीपक कृष्णाजी साकोरे,उपमहानिरीक्षक
श्री राजेश रामचंद्र बनसोडे,पोलीस अधीक्षक
श्री सुनील जयसिंग तांबे,पोलीस उपअधीक्षक
श्रीमती ममता लॉरेन्स डिसूझा, सहाय्यक पोलीस आयुक्त
श्री धर्मपाल मोहन बनसोडे,सहाय्यक पोलीस आयुक्त
श्री मधुकर माणिकराव सावंत,निरीक्षक
श्री राजेंद्र कारभारी कोते,निरीक्षक
श्री रोशन रघुनाथ यादव,पोलीस उपअधीक्षक
श्री अनिल लक्ष्मण लाड,पोलीस उपअधीक्षक
श्री अरुण केरभाऊ डुंबरे,सहाय्यक पोलीस आयुक्त
श्री नजीर नसीर शेख,उपनिरीक्षक
श्री श्रीकांत चंद्रकांत तावडे,उपनिरीक्षक
श्री महादेव गोविंद काळे,उपनिरीक्षक
श्री तुकाराम शिवाजी निंबाळकर,उपनिरीक्षक
श्री आनंदराव पुंजाराव मस्के,सहाय्यक उपनिरीक्षक
श्री रवींद्र बाबुराव वानखेडे,उपनिरीक्षक
श्री सुरेश चिंतामण मनोरे,निरीक्षक
श्री राजेंद्र देवमान वाघ,उपनिरीक्षक
श्री संजय अंबादासराव जोशी,सहाय्यक उपनिरीक्षक
श्री दत्तू एकनाथ गायकवाड,सहाय्यक उपनिरीक्षक
श्री नंदकिशोर ओंकार बोरोले,सहाय्यक उपनिरीक्षक
श्री आनंद रामचंद्र जंगम,सहाय्यक उपनिरीक्षक
श्रीमती. सुनिता विजय पवार,सहाय्यक उपनिरीक्षक
श्री जितेंद्र विठ्ठल म्हात्रे,सहाय्यक उपनिरीक्षक
श्री प्रफुल्ल रामचंद्र सुर्वे,सहाय्यक उपनिरीक्षक
श्री राजेंद्र शंकर काळे,सहाय्यक उपनिरीक्षक
श्री सलीम गनी शेख,सहाय्यक उपनिरीक्षक
श्री तुकाराम रावसाहेब आव्हाळे,सहाय्यक उपनिरीक्षक
श्री रामभाऊ संभाजी खंडागळे,हेड कॉन्स्टेबल
श्री संजय भास्करराव चोबे,प्रमुख कॉन्स्टेबल
श्री सय्यद इक्बाल हुसेन सय्यद माथार हुसेन,सहाय्यक उपनिरीक्षक
श्री विजय दामोदर जाधव,हेड कॉन्स्टेबल
श्री रामराव वामनराव नागे,सहाय्यक उपनिरीक्षक
श्री दिलीप भोजुसिंग राठोड,हेड कॉन्स्टेबल
श्री आयुबखान अकबर मुल्ला,हेड कॉन्स्टेबल
सुधारात्मक सेवा – गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (MSM)

श्री विवेक वसंत झेंडे,अतिरिक्त अधीक्षक
श्री अहमद शमशुद्दीन मणेर,हवालदार
श्री गणेश महादेव गायकवाड,हवालदार
श्री प्रल्हाद दत्तात्रय कुदळे,हवालदार
श्री तुळशीराम काशिनाथ गोरावे, हवालदार

हे ही वाचा :

जगातील सर्वात उंच पुलावरून धावली ‘वंदे भारत एक्सप्रेस’

Airtel, Jio आणि Vi चे कॉलिंगसाठी नवे प्लॅन लाँच, वाचा सर्वात स्वस्त प्लॅन कोणता 

सामान्य नागरिकांना महागाईचा झटका ; बस, टॅक्सी आणि रिक्षाच्या प्रवास भाड्यात वाढ

पुण्यात भीषण अपघात! नियंत्रण सुटलं; डंपरखाली दोन तरुणींचा मृत्यू

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची गळा दाबून हत्या ; पतीला जन्मठेप

हनीमुनपूर्वी सासरच्यांकडून वधूची व्हर्जिनीटी टेस्ट, न्यायालयाचा मोठा दणका

भंडाऱ्यातील कंपनीत भीषण स्फोट; 8 जणांचा मृत्यू, अनेक कर्मचारी गंभीर जखमी

Exit mobile version