Pride of Karnataka : गोल्डन चॅरियट कर्नाटकमधील एक लक्झरी ट्रेन आहे, आणि ही भारतीय रेल्वेची एक आलिशान पर्यटन प्रवासी रेल्वेगाडी आहे. ही गाडी दक्षिण भारतामधील कर्नाटक, गोवा, केरळ, तामिळनाडू व पुडुचेरी ह्या राज्यांतून धावते. (Golden Chariot train)
जांभळ्या व सोनेरी रंगांत रंगवलेली ही १९ डब्यांची गाडी २३ जानेवारी २००८ सालापासून चालू आहे. पॅलेस ऑन व्हील्स व डेक्कन ओडिसीच्या धर्तीवर प्रवाशांना आरामदायी व आलिशान सेवा पुरवणारी गोल्डन चॅरियट कर्नाटक राज्य पर्यटन विकास महामंडळाद्वारे चालवण्यात येते.
सोशल मीडियावर सध्या या शाही ट्रेनची झलक पाहायला मिळत आहे. अनेक प्रवाशांनी इंस्टाग्रामवर या ट्रेनचे रिल अपलोड केले आहेत.
Golden Chariot train
वेस्टर्न रेल्वेच्या या ट्रेनमध्ये 40 शानदार केबिन, स्पा, जिम, रेस्टॉरंटसह 5 स्टार सुविधांचा समावेश आहे. या ट्रेन मधून पर्यटकांना शाही अनुभव मिळत आहे.
गोल्डन चॅरियटमध्ये मिळतात तीन प्रकारचे पॅकेज
प्राइड ऑफ कर्नाटका: या पॅकेज अंतर्गत तुम्हाला 5 रात्री/6 दिवसांमध्ये बेंगळुरु, बांदीपुर, मैसूर, हलेबिदु, चिकमंगलुर, हम्पी आणि गोवा येथील सफर केली जाते.
ज्वेल्स ऑफ साऊथ: या पॅकेजमध्ये 5 रात्री/6 दिवसांमध्ये बेंगळुरु, मैसूर, हम्पी, महाबलीपुरम, तंजावुर, चेट्टीनाड आणि कोचीन या ठिकाणांचा समावेश आहे.
ग्लिम्प्स ऑफ कर्नाटका: या पॅकेजमध्ये 3 रात्री/4 दिवसांच्या सफरीत बेंगळुरु, बांदीपुर, मैसूर आणि हम्पी या ठिकाणांचा समावेश आहे. (Golden Chariot train)
सर्व केबिनमध्ये फर्निचर, आलिशान स्नानगृहे, आरामदायी बेड, आलिशान टीव्ही, ओटीटी अशा सेवांनी सुसज्ज आहेत. ट्रेनमध्ये सलूनचीही खास व्यवस्था आहे. या लक्झरी ट्रेनमध्ये देशी-विदेशी खाद्यपदार्थांची विशेष व्यवस्था करण्यात आली असून, त्यासाठी इथे दोन उत्कृष्ट रेस्टॉरंट्स आहेत.
या ठिकाणी शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थ दिले जातील. यासोबतच बारमध्ये उत्तम आणि ब्रँडेड वाईन आणि बिअर उपलब्ध आहे. पर्यटकांना चांगली सुरक्षा देण्यासाठी संपूर्ण ट्रेन सीसीटीव्ही कॅमेरे आणि फायर अलार्म सिस्टमने सुसज्ज आहे. आणि या ट्रेन साठी नियोजन करून बुकिंग करावे लागते.