Home राष्ट्रीय Rever Ganga pollution : गंगा नदी प्रदूषण, 20 हजार कोटी खर्च, गुणवत्तेची...

Rever Ganga pollution : गंगा नदी प्रदूषण, 20 हजार कोटी खर्च, गुणवत्तेची स्थिती अत्यंत खराब, आचमन लायकही नाही

Rever Ganga pollution

लखनौ : मानवी कचरा आणि औद्योगिक दूषित पदार्थांमुळे गंगा अत्यंत प्रदूषित झाली आहे. सध्या ती जगातील सर्वात प्रदूषित नदी मानली जाते. 600 किमी (370 मैल) पेक्षा जास्त पसरलेले क्षेत्र पर्यावरणीयदृष्ट्या मृत क्षेत्र म्हणून वर्गीकृत केले आहे. (Rever Ganga pollution)

राष्ट्रीय हरित लवाद(NGT) ने सांगितले की, उत्तर प्रदेशात दररोज लाखो लिटर घाण पाणी गंगा आणि तिच्या उपनदींमध्ये मिसळत आहे. एनजीटीने चार आठवड्यांच्या आत उत्तर प्रदेशाच्या मुख्य सचिवांना पाणी प्रदूषणाच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी तात्काळ उपाय आणि हलफनामा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

उत्तर प्रदेशात गंगा नदीत विविध ठिकाणी सांडपाणी, प्रक्रिया न केलेले रसायनयुक्त आणि मैला मिश्रित पाणी मिसळल्यामुळे नदीच्या पाण्याची गुणवत्ता अत्यंत खराब झाली आहे. एनजीटीने (NGT) सांगितले की, राज्यातील गंगा आणि तिच्या उपनदीमध्ये दररोज लाखो लिटर घाण पाणी सोडले जात आहे. एनजीटीने चार आठवड्यांच्या आत उत्तर प्रदेशाच्या मुख्य सचिवांकडून जल प्रदूषण रोखण्यासाठी तात्काळ उपायांची माहिती आणि अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

गंगा नदीला पवित्र नदी मानले जाते. ती हिमालयातील गंगोत्री हिमनदीपासून पूर्व भारतातील बंगालच्या उपसागरापर्यंत वाहते, जिथे ती विलीन होते. ती २५२५ किलोमीटरपर्यंत पसरलेली आहे. गावकरी या नदीची देवता म्हणून पूजा करतात. भारतातील एक प्रमुख समस्या म्हणजे गंगा प्रदूषण. गंगामधील प्रदूषणाचा मुख्य स्रोत औद्योगिक सांडपाणी आहे.

एनजीटीच्या अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांच्या पीठाने 6 नोव्हेंबरच्या आदेशात म्हटले की, उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये गंगेचे पाणी आचमन लायकही राहिलेले नाही.

(Rever Ganga pollution)


१९८६ मध्ये गंगा कृती आराखडा तयार करण्यात आला. या योजनेचा प्राथमिक उद्देश गंगा नदीच्या काठावरील शहरांमधून प्रदूषण काढून टाकून ती स्वच्छ करणे हा होता. ऋषिकेश ते कोलकाता पर्यंत, गंगा स्वच्छ करणे हा उद्देश होता. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने १९८४ मध्ये गंगा स्वच्छ करण्यासाठी पाच वर्षांची योजना तयार केली. १९८५ मध्ये केंद्रीय गंगा प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आणि १९८६ मध्ये गंगा स्वच्छ करण्यासाठी गंगा कृती आराखडा सुरू करण्यात आला.

20,000 कोटी रुपये खर्च करूनही गंगा नदी घाण का झाली

मागील दहा वर्षात ‘नमामि गंगे’ प्रकल्पासाठी रु. 20,000 कोटी खर्च झाले आहेत. मात्र गंगेचे प्रदूषण वाढत आहे, प्रदूषित नदीच्या प्रवाहांची संख्या 51 वरून 66 पर्यंत वाढली आहे, 71% निरीक्षण केंद्रांनी धोकादायक जीवाणू सुरक्षित पातळीपेक्षा 40 पट जास्त नोंदवले आहेत आणि प्रतिजैविक प्रतिरोधक जीवाणू आता पाण्यात आढळले आहेत.

शहरात 25 खुले नाले गंगा नदीत आणि 15 खुले नाले यमुना नदीत सीवेजचा घाण पाणी टाकत आहेत. उत्तर प्रदेश सरकारने सादर केलेल्या रिपोर्टनुसार प्रयागराजमध्ये सीवेज घाण पाण्यामध्ये 128 मिलियन लिटर प्रति दिवस (MLD) चा फरक आहे.

एनजीटीने सांगितले की, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड (CPCB) च्या 22 ऑक्टोबरच्या रिपोर्टमध्ये यूपीतील 326 नाल्यांपैकी 247 नाल्यांमध्ये पाणी शुद्धीकरण होत नाही. या नाल्यांमधून दररोज 3,513.16 MLD अपशिष्ट पाणी गंगा आणि तिच्या उपनदीमध्ये सोडले जात आहे.


CPCB च्या रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेशातील 41 ठिकाणी पाणी गुणवत्ता निरीक्षण करण्यात आले असून, 16 ठिकाणी फीकल कोलीफॉर्म बॅक्टेरिया 500/100 मिलीलीटर पेक्षा जास्त पाण्यात आढळले आहेत. हे बॅक्टेरिया माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये विविध रोगांचे कारण बनवू शकतात.

एनजीटीने एसटीपी (सीवेज ट्रीटमेंट प्लांट) चालवण्याच्या वेळापत्रकाची माहिती देखील मागितली आहे. त्याचबरोबर, एसटीपी पूर्णपणे कार्यान्वित होईपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात नदीत सीवेज गळती थांबवण्यासाठी तात्काळ उपाय सांगण्यातही सांगितले आहे.

सीपीसीबीच्या रिपोर्टनुसार, गंगा किनारी 16 शहरांमध्ये 41 एसटीपी असले तरी, त्यापैकी 6 एसटीपी बंद आहेत. आणि 35 कार्यरत एसटीपी पैकी एकच नियमांचे पालन योग्य पद्धतीने करत आहे. गंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. कारण गंगा नदी ही पवित्र आहे, तसेच भारतातील सर्वात मोठे जलक्षेत्र गंगा नदीचे आहे.

हे ही वाचा :

CIBIL स्कोअरमुळे मोडलं लग्न ; आर्थिक इतिहास पाहुन वधूपक्षाला धक्का !

अंगणवाडीत विविध पदांसाठी भरती ; मंत्री आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची माहिती

वाल्मीक कराडच्या बातम्या पाहिल्याने तरूणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण

झोमॅटो कंपनीचे नाव बदलले, आता असेल ‘हे’ नाव

धक्कादायक : ब्लूटूथच्या स्फोटामुळे १७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

शेतकऱ्यांसाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय ; जाणून घ्या 10 महत्त्वाच्या घोषणा

Exit mobile version