Pune Daund School Crime News : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका विद्यार्थ्याने शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यासाठी 100 रुपयांची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
काय घडलं नेमकं?
दौंडमधील सेंट सेबिस्टियन इंग्रजी माध्यम शाळेत इयत्ता सातवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने वर्गातील विद्यार्थ्याची खोटी सही उघड केल्यामुळे संबंधित विद्यार्थ्याने तिला लक्ष्य केलं. रागाच्या भरात त्याने अन्य एका अल्पवयीन विद्यार्थ्याला 100 रुपयांची सुपारी देत तिच्यावर अत्याचार करून हत्या करण्याचा कट रचला.
प्रकरण दडपण्याचा प्रयत्न (Pune Crime)
या प्रकरणानंतर शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी शाळेची बदनामी होऊ नये म्हणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीच्या पालकांनी मुलीच्या रडण्याचं कारण विचारताच हा प्रकार उघडकीस आला. यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
या घटनेमुळे शाळेच्या प्रशासनावरही गंभीर आरोप झाले असून, मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थिनीने दिलेल्या माहितीनुसार, तिने खोटी सही केल्याचं उघड केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याने सूडबुद्धीने हा कट रचल्याचं समोर आलं.
वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये चिंता
हा प्रकार केवळ शाळेपुरता मर्यादित नसून समाजातील लहान मुलांमध्येही वाढणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा संकेत देतो. या घटनेमुळे पालक, शाळा प्रशासन, आणि समाजाने एकत्र येऊन लहान मुलांच्या मानसिकतेवर लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
पोलिसांचा तपास सुरू
पोलिसांनी याप्रकरणी प्राथमिक तपास सुरू केला असून, संबंधित विद्यार्थ्यांशी आणि शाळेच्या प्रशासनाशी चौकशी केली जात आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हे ही वाचा :
पुण्यात समलिंगी व्यक्तींना निर्जन स्थळी बोलवून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
धक्कादायक : 12 वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
‘यापेक्षा चांगलं, टपरी टाक…’, शार्क टँक इंडियाचे जज अनुपम मित्तल संतापले? वाचा काय आहे प्रकरण
ब्रेकिंग : काँग्रेस नेत्याच्या घरी ५० लाखांची चोरी; रोख रक्कम, मौल्यवान वस्तू लंपास
पुण्यात बेरोजगारीचे भीषण वास्तव ; 50 जागांसाठी 5,000 उमेदवारांची गर्दी, व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्राला ४८ जणांना ‘पोलीस पदके’ तर चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक