Kumbh Mela Stampede : महाकुंभमेळ्यात आज मौनी अमावस्याच्या दिवशी संगम तटावर भगदड उडाली. यामध्ये १७ लोक मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे आणि काही लोक जखमी होऊन बेशुद्ध झाले. घटनास्थळी प्रशासनाने तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मेळ्यातील भगदडनंतर निरंजनी अखाड्याने स्नान जुलूस थांबवला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून या घटनेची माहिती घेतली आहे.
प्रयागराजच्या संगम तटावर अमृत स्नानापूर्वी, रात्री २ वाजेच्या सुमारास भगदड उडाली. या घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. एका प्रत्यक्षदर्शीच्या मते, अचानक लोक धावू लागले. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली, यात अनेक महिला लहान मुले यांना चेंगरण्यात आले. यात अनेकांचा मृत्यू झाला तर शेकडो जखमी झाले. सध्या प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही.
घटनेनंतर काही महिलांना जमिनीवर पडताना आणि लोक त्यांना चेंगरत त्यांच्यावरून जाताना दिसले. घटनास्थळी पाचपेक्षा जास्त अॅम्ब्युलन्स मदतीसाठी दाखल झाल्या आणि जखमींना सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
संगम तटावर अनेक भाविक बेशुद्ध (Kumbh Mela Stampede)
संगम तटावर अनेक भाविक बेशुद्ध झाले आहेत. जखमींमध्ये महिलांसोबतच लहान मुलेही आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एनएसजी आणि लष्कराने प्रयत्न केले. जखमींना सेंट्रल हॉस्पिटलमध्ये ५० पेक्षा जास्त अॅम्ब्युलन्सच्या सहाय्याने नेण्यात आले आहे. काही जखमींना मोटरसायकलवरूनही रुग्णालयात पोचवले गेले आहे.
मोठ्या गर्दीमुळे शैव अखाड्यांनी स्नान स्थगित केले आहे. महानिर्वाणी आणि निरंजनी अखाड्यांचे साधू संत आणि नागा संन्यासी स्नानासाठी बाहेर गेले नाहीत. अखाडा परिषद अध्यक्ष श्रीमहंत रविंद्रपुरी यांनी सांगितले की, मोठ्या गर्दीमुळे स्नान रोखण्यात आले आहे. जर परिस्थिती सामान्य झाली तरच स्नान पुन्हा सुरू होईल, अन्यथा स्नान रद्द केले जाईल.
हे ही वाचा :
ऑनलाईन गेमिंगमुळे 17 वर्षीय तरुणीची हाताची नस कापून गळ्यावर जखम
धक्कादायक : अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करून, मारून टाकण्यासाठी दिली 100 रुपयांची सुपारी
पुण्यात समलिंगी व्यक्तींना निर्जन स्थळी बोलवून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
धक्कादायक : 12 वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
‘यापेक्षा चांगलं, टपरी टाक…’, शार्क टँक इंडियाचे जज अनुपम मित्तल संतापले? वाचा काय आहे प्रकरण
ब्रेकिंग : काँग्रेस नेत्याच्या घरी ५० लाखांची चोरी; रोख रक्कम, मौल्यवान वस्तू लंपास