Deepseek AI : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात अमेरिकन कंपन्यांनी वर्चस्व राखण्यासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक सुरू केली असतानाच, चीनच्या डीपसीक (DeepSeek) या AI स्टार्टअपने कमीत कमी खर्चात नवे चॅटबॉट विकसित करून अमेरिकन कंपन्यांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. डीपसीकने विकसित केलेले हे चॅटबॉट अमेरिकेतील ओपन एआयच्या चॅटजीपीटी (ChatGPT) ला पर्याय ठरू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
अमेरिका, युके, चीनमध्ये App Store वर सर्वात लोकप्रिय
डीपसीक अॅप अमेरिका, युके आणि चीनमध्ये अॅपलच्या अॅप स्टोअरवरील सर्वाधिक डाउनलोड होणारे अॅप बनले आहे. अल्पावधीत या अॅपच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ झाली आहे, यामुळे NVIDIA, Microsoft आणि Meta यांसारख्या कंपन्यांच्या गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
Deepseek AI मुळे अमेरिकन टेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण
डीपसीकच्या यशामुळे AI क्षेत्रात प्रचंड खर्च करण्याच्या अमेरिकन कंपन्यांच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिणामी, अमेरिकन टेक कंपन्यांचे शेअर्स कोसळले असून, NVIDIA, Microsoft आणि Meta यांचे मोठे नुकसान झाले आहे.
AI कंपन्यांसाठी चिप पुरवणाऱ्या NVIDIA च्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदार चिंतेत आहेत. भारतातील अनंत राज, नेटवेब टेक्नॉलॉजीज आणि झेन टेक्नॉलॉजीज या कंपन्यांच्याही शेअर्सच्या किंमती झपाट्याने घसरल्या.
ओपन एआय, Google आणि Microsoft अब्जावधी डॉलर्स खर्च करून AI मॉडेल्स विकसित करीत आहेत, मात्र डीपसीकने तुलनेत खूपच कमी खर्चात हे मॉडेल विकसित करून बाजारात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
अमेरिकेच्या AI वर्चस्वाला आव्हान?
आता पर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात अमेरिकन कंपन्यांचा वरचष्मा होता, मात्र डीपसीकच्या यशामुळे अमेरिका AI क्षेत्रात अजिंक्य आहे हा समज बदलण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :
मोठी बातमी : राज्यात लवकरच 10,000 जागांसाठी पोलिस भरती
कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, १७ जणांचा मृत्यू, शेकडो जखमी
गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; केंद्रीय आरोग्य टीम पुण्यात येणार
चिमुकल्याने 26 जानेवारीला सादर केला लावणीवर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल
ऑनलाईन गेमिंगमुळे 17 वर्षीय तरुणीची हाताची नस कापून गळ्यावर जखम
धक्कादायक : अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करून, मारून टाकण्यासाठी दिली 100 रुपयांची सुपारी