Home आंतरराष्ट्रीय डोनाल्ड ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता

डोनाल्ड ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता

राष्ट्राध्यक्ष पदाच्या शपथविधीनंतर डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्याची शक्यता Donald Trump likely to visit India after being sworn in as President

Donald Trump Plans India Visit : अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांच्या संभाव्य भारत भेटीबाबत सल्लागारांशी चर्चा केली असल्याचे मीडिया रिपोर्ट्समधून समोर आले आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, ट्रम्प यांचा भारत दौरा एप्रिलमध्ये किंवा वर्षाच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. या दौऱ्यादरम्यान ते क्वाड शिखर परिषदेचा (QUAD Summit) भाग होतील, जिथे जपान, भारत, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाचे नेते एकाच व्यासपीठावर एकत्र येतील.

भारत दौऱ्यापूर्वी चीनला भेट देण्याची शक्यता (Donald Trump) :

ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम चीनला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या सल्लागारांच्या माहितीनुसार, शी जिनपिंग यांच्याशी संबंध दृढ करण्यासाठी ते हा दौरा करतील. याआधी ट्रम्प यांनी चीनवर अतिरिक्त शुल्क लादल्यामुळे अमेरिका-चीन संबंध ताणले गेले होते. चीनसोबतचे व्यापार आणि आर्थिक संबंध सुधारण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा ठरू शकतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना या वसंत ऋतूमध्ये व्हाईट हाऊस बैठकीसाठी आमंत्रित करण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

शपथविधी समारंभात भारत आणि चीनचे प्रतिनिधित्व :

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभाला भारताचे प्रतिनिधित्व परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर करतील, तर चीनकडून उपराष्ट्रपती हान झेंग उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, अमेरिकेच्या अध्यक्षीय शपथविधीला चीनकडून वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हे ही वाचा :

धक्कादायक : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या ५ तरुणांना एसटी बसने चिरडले

राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर, पहा तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण?

‘आर्टी’च्या प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन

चार हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेतील अर्ज घेतले मागे, वाचा काय आहे कारण !

मूत्र पाजलं, काळं फासलं, मिरचीची धुरी दिली; ७७ वर्षीय आदिवासी वृद्ध महिलेची छळवणूक

इन्फोसिसमध्ये 20,000 हून अधिक पदांसाठी भरतीची घोषणा

भारतीय स्टेट बँक अंतर्गत 600 पदांची भरती, पात्रता – पदवी

राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू; १५,००० पदे भरली जाणार

Exit mobile version