Home ताज्या बातम्या धक्कादायक : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या ५ तरुणांना एसटी बसने चिरडले

धक्कादायक : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या ५ तरुणांना एसटी बसने चिरडले

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या ५ तरुणांना एसटी बसने चिरडले Beed Accident 5 youths preparing for police recruitment crushed by ST bus

Beed Accident : बीड परळी महामार्गावर आज सकाळी घडलेल्या भीषण अपघातात पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. व्यायामासाठी पहाटे रस्त्यावर धावणाऱ्या या पाच तरुणांना भरधाव वेगात येणाऱ्या एसटी बसने चिरडले. या दुर्घटनेने घोडका राजुरी गावावर शोककळा पसरली आहे.

मृत तरुणांची ओळख :
ओम सुग्रीव घोडके (वय १९ वर्ष)
विराट बाब्रुवान घोडके (वय १८ वर्ष)
सुबोध बाबासाहेब मोरे (वय १९ वर्ष)

हे तिघेही घोडके राजुरी गावातील रहिवासी होते. ओम आणि विराट घोडके यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुबोध मोरे गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

अपघात सकाळी ६ वाजता मोची पिंपळगाव फाट्याजवळ झाला. रस्त्यावर व्यायाम करत असलेल्या तरुणांना बस क्रमांक MH 14 BT 1473 ने धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की घटनास्थळी रक्त आणि मांसाचा सडा पडला होता. बस सिमेंटच्या रस्त्यावरून घसरल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

तरुणांचे खाकी वर्दीचे स्वप्न राहिले अपूर्ण (Beed Accident) :

घोडका राजुरी गावातील हे तरुण पोलीस भरतीसाठी सराव करत होते. दररोजप्रमाणे व्यायामासाठी ते रस्त्यावर धावत असताना हा दुर्दैवी अपघात झाला. त्यांच्या मृत्यूमुळे गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

अपघात नेमका कशामुळे घडला याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून मृत तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हे ही वाचा :

राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर, पहा तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण?

‘आर्टी’च्या प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन

चार हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेतील अर्ज घेतले मागे, वाचा काय आहे कारण !

मूत्र पाजलं, काळं फासलं, मिरचीची धुरी दिली; ७७ वर्षीय आदिवासी वृद्ध महिलेची छळवणूक

इन्फोसिसमध्ये 20,000 हून अधिक पदांसाठी भरतीची घोषणा

भारतीय स्टेट बँक अंतर्गत 600 पदांची भरती, पात्रता – पदवी

राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू; १५,००० पदे भरली जाणार

Exit mobile version