Ladki Bahin Yojana : राज्यातील चर्चेत असलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत मोठी माहिती समोर आली आहे. राज्यातील सुमारे चार हजारहून अधिक महिलांनी या योजनेतील लाभावर दावा सोडला असल्याचे समजते. यामागे सरकारद्वारे संभाव्य वसुलीची भीती असल्याचे बोलले जात आहे. मात्र, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी आणि महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की, सरकारचा लाभाची रक्कम वसूल करण्याचा कोणताही विचार नाही.
Ladki Bahin Yojana वरील महिलांनी दावा का सोडला?
महिला व बालविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी झाल्यावर लाभाची रक्कम दंडासहित वसूल केली जाईल, अशी भीती महिलांमध्ये पसरली आहे. परिणामी, स्थानिक सरकारी कार्यालयांत महिलांनी योजनेतून आपले नाव वगळण्याचे अर्ज दाखल करायला सुरुवात केली आहे.
सरकारची भूमिका
महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, सरकारने लाभार्थ्यांकडून पैसे परत घेण्याचा कोणताही विचार केलेला नाही. मात्र, योजनेचा लाभ फक्त पात्र आणि गरजू महिलांनाच मिळावा, यासाठी अर्जांची फेरपडताळणी केली जाईल.
लाडकी बहीण योजनेची पार्श्वभूमी
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही योजना सुरु करण्यात आली होती. योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही पडताळणी किंवा निकष न लावता लाभ देण्यात आल्याने राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडला. मात्र, विधानसभा निवडणुकीत योजनेचा महायुती सरकारला मोठा फायदा झाला आणि ते पुन्हा सत्तेत आले.
अर्ज बाद होण्याची शक्यता
सध्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून अर्जांची फेरपडताळणी होणार आहे. या प्रक्रियेमुळे जवळपास चार लाख महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महिलांना योजनेच्या लाभातून वगळले जाऊ शकते.
हे ही वाचा :
मूत्र पाजलं, काळं फासलं, मिरचीची धुरी दिली; ७७ वर्षीय आदिवासी वृद्ध महिलेची छळवणूक
इन्फोसिसमध्ये 20,000 हून अधिक पदांसाठी भरतीची घोषणा
भारतीय स्टेट बँक अंतर्गत 600 पदांची भरती, पात्रता – पदवी
पुणे : नारायणगाव येथे तीन वाहनांचा भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू, मृतांपैकी पाच जण एकाच गावातील
राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू; १५,००० पदे भरली जाणार
लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्त्या कधी ? महत्वाची माहिती समोर
चाकण शिक्रापूर महामार्गावर कंटेनरने 15 वाहनांना उडवले, अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ समोर
कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर ; आठवा वेतन आयोग स्थापनेस केंद्र सरकारची मंजूरी