Home ताज्या बातम्या ब्रेकिंग : लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्त्या कधी ? महत्वाची माहिती समोर

ब्रेकिंग : लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्त्या कधी ? महत्वाची माहिती समोर

लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार Ladki Bahin Yojana When will dear sisters get an installment of Rs 2100

Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांसाठी महत्वाची असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? असा प्रश्न राज्यातील लाडक्या बहि‍णींना पडला होता. यासंदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

Ladki Bahin Yojana योजनेचा जानेवारीचा हप्त्या कधी ?

मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, “लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता २५ ते ३० डिसेंबर दरम्यान वितरीत करण्यात आला होता. आता जानेवारी महिन्याचा हप्ता २६ जानेवारीच्या आधी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला जाईल. यासाठी आवश्यक आर्थिक नियोजन महिला व बालविकास विभागाला अर्थखात्याकडून प्राप्त झाले आहे. त्यामुळे २६ जानेवारीच्या आधी हप्त्याचे वितरण सुरू होईल व तीन ते चार दिवसांत लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील.”

दर महिन्याच्या अखेरीस लाभ देण्याचा सरकारचा प्रयत्न असतो, असेही त्यांनी नमूद केले. जानेवारी महिन्याचा हप्ता वेळेत देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली योजनेच्या वितरणाची प्रक्रिया सुरू आहे.

१५०० रुपये की २१०० रुपये?

लाडक्या बहिणींना १५०० रुपये मिळणार की २१०० रुपये, असा सवाल माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित केला असता, मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले. “सध्या योजनेअंतर्गत १५०० रुपयांचा लाभ महिलांना दिला जाणार आहे. मात्र, नवीन अर्थसंकल्पात २१०० रुपये देण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल,” असे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा :

चाकण शिक्रापूर महामार्गावर कंटेनरने 15 वाहनांना उडवले, अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ समोर

कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर ; आठवा वेतन आयोग स्थापनेस केंद्र सरकारची मंजूरी

अमित शाह सर्वांसमोर जय शाह यांच्यावर चिडले, व्हिडिओ व्हायरल

महाराष्ट्रात २१ नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार, ‘या’ दिवशी घोषणेची शक्यता

मोठी बातमी : सैफ अली खानवर चाकू हल्ल्या, 6 मोठ्या गंभीर जखमी

‘युपीएससी’ परीक्षेच्या मुलाखतीसाठी मोफत प्रशिक्षण

नायलॉन मांज्यामुळे नाशिक आणि अकोला मध्ये गळा चिरून दोन जणांचा मृत्यू

Exit mobile version