मुंबई : महाराष्ट्र राज्यात प्रशासनिक सोयीसाठी आणि स्थानिक विकासाला चालना देण्यासाठी २१ नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या ३५ जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांचे विभाजन करून हे नवीन जिल्हे निर्माण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (New Districts)
महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी केवळ २५ जिल्ह्यांसह झाली होती. त्यानंतर वाढती लोकसंख्या आणि प्रशासकीय गरजांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांचे पुनर्गठन करण्यात आले. त्यानंतर आता २१ जिल्ह्यांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. २०१८ मध्ये राज्य सरकारने गठीत केलेल्या समितीने २२ नवीन जिल्ह्यांचा प्रस्ताव सादर केला होता.
या २१ नवीन जिल्ह्यांचा प्रस्ताव सादर (New Districts)
प्रस्तावित नवीन २१ जिल्ह्यांमध्ये भुसावळ, उदगीर, अंबेजोगाई, मालेगाव, कळवण, किनवट, मीरा-भाईंदर, कल्याण, माणदेश, खामगाव, बारामती, पुसद, जव्हार, अचलपूर, साकोली, मंडणगड, महाड, शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर, आणि अहेरी या शहरांचा समावेश आहे. या नवीन जिल्ह्यांची अधिकृत घोषणा २६ जानेवारी २०२५ रोजी होण्याची शक्यता आहे.
प्रशासकीय सुधारणा व स्थानिक विकासाची गती हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे स्थानिक पातळीवर विकासकामांना चालना मिळेल, प्रशासकीय कामकाज सुलभ होईल आणि नागरी सुविधांमध्ये वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
हे ही वाचा :
मोठी बातमी : सैफ अली खानवर चाकू हल्ल्या, 6 मोठ्या गंभीर जखमी
‘युपीएससी’ परीक्षेच्या मुलाखतीसाठी मोफत प्रशिक्षण
नायलॉन मांज्यामुळे नाशिक आणि अकोला मध्ये गळा चिरून दोन जणांचा मृत्यू
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत, महायुतीच्या आमदारांना करणार मार्गदर्शन
ग्राहकांसाठी खूशखबर : ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर मोठा सेल, 40-70% पर्यंत सूट