Home ताज्या बातम्या अमित शाह सर्वांसमोर जय शाह यांच्यावर चिडले, व्हिडिओ व्हायरल

अमित शाह सर्वांसमोर जय शाह यांच्यावर चिडले, व्हिडिओ व्हायरल

अमित शाह हे सर्वांसमोर जय शाह यांच्यावर चिडले, व्हिडिओ व्हायरल Amit Shah gets angry with Jai Shah in front of everyone, video goes viral

Amit Shah angry on Jay Shah Viral Video : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तरायण उत्सवाच्या निमित्ताने बुधवारी आपल्या कुटुंबासमवेत गुजरातमधील अहमदाबाद येथील जगन्नाथ मंदिरात दर्शन घेतले. या भेटीदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये अमित शाह मंदिरातील आरती समारंभात विधी करताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा, आयसीसीचे नवे अध्यक्ष जय शाह देखील होते. जय शाह आपल्या लहानग्या मुलाला हातात घेऊन उभे असतानाचा प्रसंग या व्हिडिओत कैद झाला आहे.

Amit Shah angry on Jai Shah Video

आरती संपल्यानंतर अमित शाह सर्वांसमोर निरंजन पुढे करत आरती देत होते. यावेळी आरतीच्या दिव्याचा प्रकाश आपल्या लहानग्या मुलावर पडू नये, म्हणून जय शाह अमित शाह यांना सावध करताना दिसले. मात्र, जय शाह यांची ही कृती अमित शाह यांना आवडली नाही. त्यांनी तत्काळ आपल्या मुलाला सुनावत म्हटले, “कस्सू नाय ठाय, तारे काई नवो नको छोकरो चे.”

या वाक्याचा मराठी अर्थ असा होतो, “काही होणार नाही, तुझा मुलगा विशेष आहे का?” अमित शाह यांच्या या प्रतिक्रीयेमुळे वातावरण हलकंफुलकं झालं.

अमित शाह आणि जय शाह यांच्या या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून लोक त्यावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. हा प्रसंग शाह कुटुंबीयांमधील साधेपणा आणि मोकळेपणाचे दर्शन घडवतो, अशी अनेकांनी प्रशंसा केली आहे.

हे ही वाचा :

महाराष्ट्रात २१ नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार, ‘या’ दिवशी घोषणेची शक्यता

मोठी बातमी : सैफ अली खानवर चाकू हल्ल्या, 6 मोठ्या गंभीर जखमी

‘युपीएससी’ परीक्षेच्या मुलाखतीसाठी मोफत प्रशिक्षण

नायलॉन मांज्यामुळे नाशिक आणि अकोला मध्ये गळा चिरून दोन जणांचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत, महायुतीच्या आमदारांना करणार मार्गदर्शन

ग्राहकांसाठी खूशखबर : ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर मोठा सेल, 40-70% पर्यंत सूट

महाकुंभ टाईप केल्यानंतर गूगल सर्च पेज वर पुष्पवृष्टी

Exit mobile version