Home ताज्या बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत, महायुतीच्या आमदारांना करणार मार्गदर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत, महायुतीच्या आमदारांना करणार मार्गदर्शन

नरेंद्र मोदींची राज्यातील सभांची मोहीम ; महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार Narendra Modi campaign meetings ; Campaigning Alliance candidates

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज मुंबई दौऱ्यावर येत असून महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात सकाळी 10.30 वाजता मोदींच्या हस्ते आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी, आणि आयएनएस वाघशीर या तीन युद्धनौकांचे राष्ट्रार्पण होणार आहे. या ऐतिहासिक क्षणाला भारतीय नौदलासाठी मोठे महत्त्व असून राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा मोलाचा टप्पा ठरेल.

PM Narendra Modi महायुतीच्या आमदारांना करणार मार्गदर्शन

त्यानंतर पंतप्रधान महायुती सरकारच्या सर्व मंत्री आणि आमदारांसोबत दोन तासांचा संवाद साधणार आहेत. या संवादात पंतप्रधान भाजप, शिवसेना, आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना मार्गदर्शन करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि अजित पवार यांच्यासह महायुतीचे सर्व मंत्री आणि आमदार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधानांकडून मंत्र्यांना दिल्या जाणाऱ्या कानमंत्राकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दुपारी साडेतीन वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन होईल. या भव्य मंदिराचे उद्घाटन धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जात आहे.

डिसेंबरमध्ये महायुती सरकारच्या शपथविधीसाठी मुंबईत आलेल्या मोदींचा हा दुसरा दौरा आहे.

हे ही वाचा :

ग्राहकांसाठी खूशखबर : ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर मोठा सेल, 40-70% पर्यंत सूट

महाकुंभ टाईप केल्यानंतर गूगल सर्च पेज वर पुष्पवृष्टी

पुण्यात विद्यार्थ्यांची फ्रीस्टाईल हाणामारी, कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण

‘लाडकी बहीण’ योजनेवरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले, मोफत पैसे…

सुंदर स्टेटस ठेवला अन् काही वेळातच भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू

‘सारथी’मार्फत तरुणांना वाहनचालक प्रशिक्षण, 10 हजार विद्यावेतन मिळणार

Exit mobile version