Home ताज्या बातम्या ‘सारथी’मार्फत तरुणांना वाहनचालक प्रशिक्षण, 10 हजार विद्यावेतन मिळणार

‘सारथी’मार्फत तरुणांना वाहनचालक प्रशिक्षण, 10 हजार विद्यावेतन मिळणार

‘सारथी’ मार्फत दीड हजार तरुणांना वाहनचालक प्रशिक्षण, 10 हजार रुपये विद्यावेतन मिळणार Driving training to 1500 youth through Sarathi

पुणे : ‘सारथी’ (Sarathi) मार्फत ‘सरदार सूर्याजी काकडे सारथी वाहन चालक कौशल्य विकास प्रशिक्षण’ कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजातील एक हजार ५०० विद्यार्थ्यांना दरवर्षी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानुसार १० जानेवारीपासून नोंदणी सुरु असल्याची माहिती सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी दिली आहे. (Sarathi)

प्रशिक्षित वाहन चालकांची देशात व देशाबाहेर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. प्रशिक्षित वाहनचालक उपलब्ध करण्यासाठी तरुण-तरुणींना रोजगार व स्वयंरोजगारासाठी संधी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांच्या रस्ता सुरक्षा उपक्रमांतर्गत असलेल्या आय.डी.टी.आर. पुणे या केंद्र शासनाच्या संस्थेमार्फत एका महिन्याचे प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येणार आहे. दररोज आठ तासासाठी हे प्रशिक्षण राहील त्यामध्ये वाहनांचे भाग त्याचे देखभाल व दुरुस्ती तसेच ड्रायव्हिंगचे भारतातील व परदेशातील नियमांची माहिती देण्यात येईल.

दररोज क्षेत्रीय स्तरावर सराव व प्रशिक्षण देण्यात येईल. या विद्यार्थ्यांना एका प्रशिक्षण महिन्यासाठी रुपये १० हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात तसेच परदेशात या माध्यमातून रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे. याकरिता जास्तीत जास्त सारथी लक्षित गटातील उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सारथी संस्थेच्या https://sarthi-maharashtragov.in/ या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन काकडे यांनी केले आहे.

हे ही वाचा :

एसटी प्रवाशांसाठी खूशखबर : लालपरीचे लाईव्ह लोकेशन आता मोबाईलवर मिळणार

१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध

वडीलांनी मोबाईल न दिल्याने मुलाची आत्महत्या, वडिलांनीही संपवलं जीवन

‘लाडकी बहीण’ योजनेवरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले, मोफत पैसे…

केरळ मंदिर महोत्सवात हत्तीने माणसाला उचलून हवेत फेकले, भीषण व्हिडिओ

तिरुपती बालाजी मंदिरात भगदड: ६ भाविकांचा मृत्यू

पीएम आवास योजना ते पीएम किसान पर्यंत, बजेटमध्ये या सरकारी योजनांना मिळू शकतो बूस्ट

Exit mobile version