Actor Arvind Pilgaonkar : मराठी संगीत रंगभूमीचे ज्येष्ठ गायक-अभिनेते अरविंद पिळगावकर यांचे वृद्धापकाळाने रविवारी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
अरविंद पिळगावकर (Actor Arvind Pilgaonkar) यांनी यशवंतराव होळकर या ऐतिहासिक नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले. त्यांनी ललितकलादर्श, कलावैभव, नाट्यमंदार, रंगशारदा आणि चंद्रलेखा यांसारख्या संस्थांच्या अनेक नाटकांमध्ये भूमिका साकारल्या. त्यांच्या संगीत मानापमान या नाटकातील धैर्यधर व लक्ष्मीधर या दोन्ही भूमिकांना प्रेक्षकांनी विशेष दाद दिली.
विल्सन महाविद्यालयातून बी.ए. पदवी मिळवल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात लिपिक म्हणून नोकरी केली. त्यानंतर त्यांनी पूर्णवेळ गायन व अभिनयाचा मार्ग स्वीकारला. संगीत आणि नाट्यक्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा अण्णासाहेब किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
हे ही वाचा :
एसटी प्रवाशांसाठी खूशखबर : लालपरीचे लाईव्ह लोकेशन आता मोबाईलवर मिळणार
१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध
वडीलांनी मोबाईल न दिल्याने मुलाची आत्महत्या, वडिलांनीही संपवलं जीवन
‘लाडकी बहीण’ योजनेवरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले, मोफत पैसे…
केरळ मंदिर महोत्सवात हत्तीने माणसाला उचलून हवेत फेकले, भीषण व्हिडिओ