Home ताज्या बातम्या राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू; १५,००० पदे भरली जाणार

राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू; १५,००० पदे भरली जाणार

राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू; १५,००० पदे भरली जाणार Second phase of teachers recruitment process in state begins bharti

Teachers Recruitment : राज्यातील खासगी अनुदानित आणि जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रियेचा बहुप्रतीक्षित दुसरा टप्पा सुरू झाला आहे. शालेय शिक्षण विभागाने या प्रक्रियेसाठी पवित्र पोर्टल विकसित करण्याची जबाबदारी तलिस्मा कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेडला सोपवली आहे. विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी अखेर रिक्त पदांच्या जाहिराती पोर्टलवर अपलोड केल्या जातील, तर जून अखेर संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण होईल. (Teachers bharti)

१५,००० पदे भरण्याचा अंदाज (Teachers bharti)

शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची लवकरच अंमलबजावणी होईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पात्र उमेदवारांकडून सेल्फ सर्टिफिकेट भरून घेतले जाईल. त्यानंतर गुणवत्तेनुसार उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. या टप्प्यात अंदाजे १५,००० पदे भरण्यात येतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यातील भरतीनंतरही अनेक पदे रिक्त राहिल्याने शिक्षक संघटना आणि लोकप्रतिनिधींनी सातत्याने मागणी केली होती. शासनाने ही बाब लक्षात घेऊन दुसऱ्या टप्प्यास मंजुरी दिली आहे.

नवीन अभ्यासक्रमाची तयारी सुरू

दरम्यान, राज्य शासनाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आधारावर पहिली आणि दुसरीच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या वर्गांसाठी पाठ्यपुस्तकांची निर्मिती पूर्ण झाली असून जानेवारी अखेर छपाई प्रक्रिया सुरू होणार आहे. मराठी शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नप्रमाणे अभ्यासक्रम राबवण्यासाठीही नियोजन पूर्ण झाले आहे.

हे ही वाचा :

भारतीय टपाल विभागा अंतर्गत तब्बल 25,000 पदांसाठी भरती होणार

भारतीय रेल्वे अंतर्गत तब्बल 32,000 पदांसाठी मेगा भरती, पात्रता- 10 वी पास

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत भरती, असा करा अर्ज

मध्य रेल्वे भुसावळ विभाग, जळगाव अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

आर्मी पब्लिक स्कूल मुंबई अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत भरती

गोखले राजकारण आणि अर्थशास्त्र संस्था, पुणे अंतर्गत भरती

रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ अंतर्गत भरती

दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

HDFC बँक अंतर्गत 500 पदांसाठी भरती, असा करा अर्ज

Exit mobile version