Home ताज्या बातम्या संतापजनक : गोरेगावमध्ये 75 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार, 20 वर्षीय तरुण अटकेत

संतापजनक : गोरेगावमध्ये 75 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार, 20 वर्षीय तरुण अटकेत

गोरेगावमध्ये 75 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार, 20 वर्षीय तरुण अटकेत 75-year-old woman raped in Goregaon, 20-year-old youth arrested Mumbai

Mumbai : मुंबईच्या गोरेगाव दिंडोशी परिसरात एक संतापजनक घटना समोर आली आहे. 75 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करणाऱ्या 20 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(1) आणि 332(B) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांना मिळाले यश (Mumbai)

ही घटना 8 जानेवारी रोजी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला एका छोट्या घरात एकटीच राहत होती. तिची मुलगी आणि बहीण अधूनमधून तिला भेटायला येत असत. तिच्या सुरक्षिततेसाठी कुटुंबीयांनी घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. याच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यात यश आले.

पीडित महिलेला स्मृतीभ्रंशाचा त्रास

पीडित महिलेला स्मृतीभ्रंशाचा त्रास असल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे. 8 जानेवारीच्या दुपारी, एका अज्ञात तरुणाने तिच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि घटनास्थळावरून फरार झाला.

आरोपीला अटक करण्यात आली आणि त्याला न्यायालयात हजर केले गेले. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, नागरिक प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी करत आहेत. वृद्ध महिलेवर झालेल्या या संतापजनक घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, दोषीला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

हे ही वाचा :

महाकुंभ मेळ्यातील व्हायरल मोनालिसा चित्रपटात दिसणार ! प्रसिद्ध दिग्दर्शकाची ऑफर

चीनच्या नव्या चॅटबॉटमुळे जगभरात खळबळ, अनेक कंपन्यांचे शेअर कोसळले

राज्यात लवकरच दहा हजार जागांसाठी पोलिस भरती

कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, १७ जणांचा मृत्यू, शेकडो जखमी

गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; केंद्रीय आरोग्य टीम पुण्यात येणार

चिमुकल्याने 26 जानेवारीला सादर केला लावणीवर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

ऑनलाईन गेमिंगमुळे 17 वर्षीय तरुणीची हाताची नस कापून गळ्यावर जखम

धक्कादायक : अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करून, मारून टाकण्यासाठी दिली 100 रुपयांची सुपारी

Exit mobile version