Thursday, May 9, 2024
Homeताज्या बातम्याMamata Banerjee : ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत, अपघात की घातपात...

Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत, अपघात की घातपात ?

Mamata Banerjee : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर टाके आणि आवश्यक त्या चाचण्या केल्यानंतर ममता बॅनर्जी यांना घरी सोडण्यात आले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गेल्या गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी फिरत असताना काही कारणाने पडल्या, त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

मात्र, ममता बॅनर्जी यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे राज्य प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले. ते म्हणाले, “गुरुवारी संध्याकाळी दक्षिण कोलकाता येथील कालीघाट येथील त्यांच्या राहत्या घरी पडल्यावर त्यांच्या कपाळाला आणि नाकाला गंभीर दुखापत झाली. आता त्यांची प्रकृती स्थिर असून आज पुन्हा एकदा तपासणी आणि काही चाचण्या केल्या जातील. (Injury on Mamata Banerjee)

ममताच्या कपाळावर तीन आणि नाकाला एक टाका लावण्यात .आलं असून आज डिस्चार्ज देण्यात आला. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी या जखमी झाल्या असल्याची माहिती तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून फोटोसह देण्यात आली आहे. आमच्या अध्यक्षांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यासाठी प्रार्थना करा, असे त्यात म्हटले आहे.(Injury on Mamata Banerjee)

तथापि, प्राथमिक वृत्तानुसार एका कार्यक्रम आटोपल्यानंतर आपल्या हरीश चॅटर्जी मार्गावरील निवासस्थानी परतल्यावर 69व्या वर्षांच्या ममता बॅनर्जी यांचा पाय घसरला आणि त्यांचे डोके फर्निचरवर आपटले. यामुळे त्यांच्या कपाळावर खोलवर जखम झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. अपघात झाला तेव्हा ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी हे देखील घरात होते. त्यांनी ममता यांना रुग्णालयात दाखल केले, असेही सांगण्यात येते. नंतर, त्यांना उपचारासाठी कोलकाता येथील IPGME&R – SSKM हॉस्पिटल सेंटरमधील बांगूर इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेसमध्ये हलवण्यात आले. मात्र, टाके आणि आवश्यक त्या चाचण्या केल्यानंतर ममता बॅनर्जी यांना त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. त्यांच्यासोबत अभिषेक बॅनर्जी यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यही होते.

हॉस्पिटलचे संचालक मनिमॉय बंदोपाध्याय म्हणाले, त्यांना कपाळावर आणि नाकाला गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. दरम्यान, एका अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी अद्याप मुख्यमंत्री पडण्यासंदर्भात कोणतीही तक्रार नोंदवली नाही. तथापि, Injury on Mamata Banerjee त्यांनी कालीघाट परिसरातील बॅनर्जी यांच्या निवासस्थानाजवळ आणि आसपास सुरक्षा वाढवली आहे. एसएसकेएम रुग्णालयाकडून असे सांगण्यात आले आहे की, काही धक्काबुक्कीमुळे मुख्यमंत्री खाली पडल्या. यावर पोलीस अधिकाऱ्याने काहीही बोलण्यास नकार दिला आहे.या संदर्भात मुख्यमंत्र्यांचे म्हणणे नोंदवायचे की स्वत:हून तक्रार दाखल करायची, याचीही माहिती पोलिसांनी दिलेली नाही.

whatsapp link

हे ही वाचा

मोठी बातमी : इलेक्टोरल बॉन्डची माहिती जाहीर भाजप मालामाल, हा मोठा घोटाळा..

मोठी बातमी : केंद्र सरकारकडून 18 OTT प्लॅटफॉर्मवर बंदची कारवाई, ‘ही’ आहे लिस्ट

ब्रेकिंग : भारत जोडो यात्रेत माकप नेते माजी आमदार जे.पी.गावित यांना धक्काबुक्की

खळबळजनक : पुण्यात चक्क अफूची शेती, पोलिसांकडून दोघांना अटक

ब्रेकिंग : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय

ब्रेकिंग : भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, राज्यातील २० उमेदवारांचा सामावेश

मुंबईतील ‘या’ आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलणार, राज्य सरकारचा निर्णय

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय