Thursday, May 9, 2024
Homeराष्ट्रीयमोठी बातमी : "हे" बनले नवे काँग्रेसचे अध्यक्ष, 24 वर्षानंतर गांधी परिवारा...

मोठी बातमी : “हे” बनले नवे काँग्रेसचे अध्यक्ष, 24 वर्षानंतर गांधी परिवारा बाहेरील अध्यक्ष

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर हे दोघे अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. या निवडणूकीचा निकाल आज लागला.

राहुल गांधी यांनी 2019 मध्ये काँग्रेसचं अध्यक्षपद सोडल्यानंतर सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष म्हणून काम बघत होत्या. काँग्रेस पक्षाच्या झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत कर्नाटकातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) विजयी झाले. 24 वर्षानंतर काँग्रेसला गांधी परिवारा बाहेरील अध्यक्ष मिळाला आहे.

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी मतदान झाले होते. अध्यक्षपद निवडणुकीसाठी जवळपास 96 टक्के मतदान झालं होतं. याची आज मतमोजणी करण्यात आली. यामध्ये शशी थरूर यांना 1072 मत मिळाली. तर मल्लिकार्जुन खरगे यांना 7898 मत मिळाली असून ते विजयी ठरले आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय