Thursday, December 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडMahesh Landge : गुलबर्गा, बिदरवासी समाजाची ताकद आमदार महेश लांडगे यांच्या पाठीशी!

Mahesh Landge : गुलबर्गा, बिदरवासी समाजाची ताकद आमदार महेश लांडगे यांच्या पाठीशी!

कर्नाटकचे माजी मंत्री तथा आमदार प्रभू चव्हाण यांचा विश्वास (Mahesh Landge)

कर्नाटकाहून पिंपरी-चिंचवडध्ये स्थायिक बांधवांचे समर्थन

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : शिक्षण, रोजगाराच्या निमित्ताने बिदर गुलबर्गा येथील अनेक नागरिक पिंपरी-चिंचवड शहरात आले आहेत. या रहिवासीयांच्या कोणत्याही प्रश्नासाठी आमदार महेश लांडगे सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहतात. समाजाचा कोणताही प्रश्न असू दे आमदार महेश लांडगे यांच्याकडे त्याचे उत्तर असते. (Mahesh Landge)

त्यामुळे बिदर, गुलबर्गा या कर्नाटक समाजातील नागरिकांचा आमदार महेश लांडगे यांना पाठिंबा असल्याचे कर्नाटक राज्याचे माजी मंत्री तथा औराद तालुक्याचे आमदार प्रभू चव्हाण यांनी सांगितले. यंदा आमदार महेश लांडगे यांची ‘हॅट्रिक’ कर्नाटकवासी पूर्ण करतील, असा विश्वास देखील चव्हाण यांनी व्यक्त केला.


महायुतीचे भोसरी मतदारसंघातील अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ समस्त कर्नाटक बांधवांच्या वतीने स्व. अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे बिदर, गुलबर्गा (कलबुर्गी) वासीयांच्या वतीने स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला. त्यावेळी प्रभु चव्हाण बोलत होते.

मुख्य अतिथी म्हणून बसवकल्याण तालुक्याचे आमदार शरणू सलगर, कार्यक्रमाचे अध्यक्ष योगेश लोंढे, माजी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, माजी नगरसेविका नम्रता लोंढे यांच्यासह कर्नाटक बंधु- भगिनी उपस्थित होते. यावेळी समस्त कर्नाटक बांधवांनी विजयाचा संकल्प महेश लांडगे यांना पाठिंबा जाहीर केला.

प्रभू चव्हाण पुढे म्हणाले की, शिक्षण व रोजगाराच्या निमित्ताने गाव सोडून इतर राज्यात, शहरात गेलेल्या आमच्या समाज बांधवांचे अनेक प्रश्न असतात. त्यांना अडचणी आल्यानंतर गावचा पुढारी म्हणून ते आम्हाला त्यांचे प्रश्न सांगतात. मात्र अशावेळी आमदार महेश लांडगे यांच्यासारखे व्यक्तिमत्व आमच्यासाठी धावून येते.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आमच्या समाज बांधवांचा कोणताही प्रश्न निर्माण झाल्यावर सर्वप्रथम महेश लांडगे यांचे नाव आमच्या डोळ्यासमोर येते. महेश लांडगे यांनी आमच्या बांधवांसाठी नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे त्यामुळे अशा व्यक्तीला निवडून आणणे आपली जबाबदारी आहे, असे प्रभू चव्हाण यांनी नागरिकांना आवाहन केले. (Mahesh Landge)

प्रतिक्रिया

कर्नाटक बांधवांचा आणि माझा नेहमीच आपुलकीचा संबंध राहिलेला आहे. प्रत्येक समाज घटकांचा शहराच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा आहे. या सर्वांच्या पाठिंबातूनच शहर शाश्वत विकासाच्या दृष्टीने वाटचाल करत आहे. गेल्या दहा वर्षात या सर्व समाज घटकांना एकसंध बांधून शहर विकासाचे स्वप्न आपण पूर्ण करत आहोत. त्यामुळे या प्रत्येक समाजाच्या पाठीशी उभे राहणे माझे नैतिक कर्तव्य आहे. या समाजाने माझ्या पाठीशी उभा राहण्याचा निर्धार केला याबद्दल त्यांचा मी नक्कीच ऋणी आहे.

महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, उमेदवार महायुती.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला भीषण अपघात

अजितदादांसाठी अभिनेत्री प्रचाराच्या मैदानात ; व्हिडिओ शेअर करत मतदानाचं आवाहन

सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट इशारा, म्हणाल्या…

नारायण राणेंच्या पत्नीने मुलांच्या व नवऱ्याच्या स्वभावाबद्दल व्यक्त केली खंत

महाबळेश्वरमध्ये मतदान जागृतीसाठी सायकल व बाईक रॅली

छगन भुजबळांना मुख्यमंत्री न करण्यामागचं शरद पवारांचं धक्कादायक स्पष्टीकरण

धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल; लाडकी बहिण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

संबंधित लेख

लोकप्रिय