Monday, December 9, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडAjit Gavhane : अजित गव्हाणे यांना निवडून आणण्यासाठी युवा सेनेची ताकद पणाला...

Ajit Gavhane : अजित गव्हाणे यांना निवडून आणण्यासाठी युवा सेनेची ताकद पणाला लावणार

युवा सेनेच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांचा निर्धार; काम करणारा माणूसच निवडून देणार (Ajit Gavhane)

दहा वर्षातील नाकर्तेपणा लपवण्यासाठी भाजपकडून धर्माचे कार्ड पुढे



पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : भाजपचा एक एक उमेदवार निवडून पाडणे हा युवा सेनेच्या कार्यकर्त्यांचा मुख्य अजेंडा असला पाहिजे. ज्या भाजपने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला चोरण्याबरोबर, सरकार पाडण्यापर्यंत निंदनीय काम केले. त्यांना धडा शिकवलाच पाहिजे असा निर्धार युवा सेनेच्या मेळाव्यात करण्यात आला. भोसरी विधानसभेमध्ये गेल्या दहा वर्षात दाखवण्यासारखे काहीच काम केले नाही म्हणून आता भाजपकडून धर्माचं कार्ड खेळले जात आहे अशी घनाघाती टीका देखील युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केली. (Ajit Gavhane)

महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ शिवसेना युवा सेनेच्या (उबाठा) वतीने निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
माजी नगरसेवक विनायक रणसुभे, अभिराज गव्हाणे , तसेच युवा सेनेचे जिल्हा प्रमुख सचिन सानप, युवासेना शहर प्रमुख अजिक्य उबाळे, उपजिल्हा प्रमुख अमित शिंदे , विभाग प्रमुख अनिकेत येरूनकर , अभिषेक सुरवसे , राकेश सानप, सौरभ फुगे, आकाश खरात, सुरज झंजूरणे , दादा समगीर, सार्थक दोशी , सुहास तळेकर, कौस्तुभ गोळे , तानाजी शिंदे, संकेत मारवळकर, सोमनाथ थरकुडे, नरेंद्र पाटील तसेच भोसरी विधानसभेतील प्रमुख पदाधिकारी तसेच युवासैनिक उपस्थित होते.

युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी मते व्यक्त केली. तुमच्या आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरस्थान असलेले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना भाजपने फसवले. धोका देऊन आमदार फोडले. युवा सैनिकांनी तडफेने जागे झाले पाहिजे. त्यांनी ही निवडणूक हातात घेऊन भाजपाला धडा शिकवला पाहिजे. भाजप आमदारांना केलेले काम दाखवता येत नसल्यामुळे महाराष्ट्रभर सध्या भाजपने जातीचे कार्ड पुढे केले आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघातही हेच सुरू आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी किमान 25 मतदार अजित गव्हाणे यांच्यासाठी जोडायचे आहेत. कोणाच्याही धमक्यांना घाबरायची गरज नाही. जशास तसे उत्तर द्यायला युवासेना खंबीर आहे. अशा भावना युवा सैनिकांनी व्यक्त केल्या. ज्याप्रमाणे शिवसेनेचे पदाधिकारी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात त्याचप्रमाणे आगामी काळात अजित गव्हाणे आपल्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास देखील या निर्धार सभेत व्यक्त करण्यात आला. (Ajit Gavhane)

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला भीषण अपघात

अजितदादांसाठी अभिनेत्री प्रचाराच्या मैदानात ; व्हिडिओ शेअर करत मतदानाचं आवाहन

सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट इशारा, म्हणाल्या…

नारायण राणेंच्या पत्नीने मुलांच्या व नवऱ्याच्या स्वभावाबद्दल व्यक्त केली खंत

महाबळेश्वरमध्ये मतदान जागृतीसाठी सायकल व बाईक रॅली

छगन भुजबळांना मुख्यमंत्री न करण्यामागचं शरद पवारांचं धक्कादायक स्पष्टीकरण

धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल; लाडकी बहिण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

संबंधित लेख

लोकप्रिय