Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याloksabha election : काँग्रेसला मोठा धक्का ; उमेदवाराचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द

loksabha election : काँग्रेसला मोठा धक्का ; उमेदवाराचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द

loksabha election : काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या एका उमेदवाराचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) अधिकृत उमेदवार रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. काँग्रेसने घोषित केलेल्या उमेदवाराचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

काँग्रेसने (Congress) रामटेक (Ratek) मतदारसंघात रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांना मैदानात उतरवले आहे. बर्वे यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला होता. बर्वे यांनी संपुर्ण मंतदार संघात जोमात प्रचारही सुरू केला असताना जात वैधता पडताळणी समितीने रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द केले आहे. त्यामुळे बर्वे यांच्यासह काँग्रेस आणि महाविकास आघाडीची मोठी अडचण झाली आहे. (loksabha election)

दरम्यान, बर्वे यांच्यावर सुनिल साळवे नावाच्या व्यक्तीने तक्रार दिली होती. प्राप्त तक्रारीनंतर सामाजिक न्याय विभागाने जात पडताळणी समितीला योग्य ती कारवाई करण्याचा आदेश दिला होता.

सामाजिक न्याय विभागाच्या आदेशानंतर जात पडताळणी समितीने बर्वे यांना नोटीस जारी केली होती. याच नोटिशीला बर्वे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. केवळी राजकीय सुडभावनेतून माझ्यावर अशा प्रकारचे आरोप करण्यात येत आहेत, असा दावा रश्मी बर्वे यांनी आपल्या याचिकेत केला होता.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

शिवनेरीवर कोल्हे आणि आढळराव आमने – सामने, भेटीचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल !

मोठी बातमी : खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला मोठा धक्का, वंचितने जाहीर केले आपले उमेदवार

मोठी बातमी : निवडणूक आयोगाला न्यायालयाचा मोठा दणका, अखेर ती निवडणूक रद्द

हार्दिक पांड्याने असे काही केले की, पांड्यावर लोक भडकले

शाहरूख खानच्या ‘त्या’ कृतीमुळे लोकांचा संताप

JNU : ‘जेएनयू’ विद्यार्थी संघाच्या निवडणूकीत डाव्यांचा दणदणीत विजय तर भाजप संलग्न अभाविपचा सुपडा साफ

संबंधित लेख

लोकप्रिय