Krishi Vibhag Bharti : राज्याच्या कृषी विभागातील कृषी सेवकांच्या रिक्त असलेल्या 2 हजार 588 जागांपैकी 2 हजार 70 जागा लवकरच भरल्या जाणार आहेत. या रिक्त जागा सरळसेवेच्या कोट्यातील असल्याने आणि या संवर्गातील रिक्त पदांचा आकृतिबंध अद्याप अंतिम झालेला नसल्याने, एकूण रिक्त जागांपैकी 80 टक्के जागाच भरण्यात येत आहेत. यानुसार कृषी विभागाच्यावतीने दोन हजार ७० जागांच्या भरतीच्या परवानगीसाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावास राज्य सरकारची मंजुरी मिळताच, याबाबतची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचे राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितले.
कृषी आयुक्तालयाच्या अखत्यारित येत असलेली ‘गट-क’ मधील विविध संवर्गातील पदांची भरती प्रक्रिया याआधीच सुरु करण्यात आली आहे. या पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच ‘पेसा’ क्षेत्रातील रिक्त पदे निश्चित करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली असल्याचे चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले. याबाबतचे सविस्तर वृत्त ‘दै.सकाळ’ ने दिले आहे.
सुधारित आकृतिबंध अद्याप अंतिम झाला नसल्यामुळे याबाबतच्या अध्यादेशातील तरतुदीनुसार वाहनचालक व गट-ड संवर्गातील रिक्त जागा वगळून सरळसेवा कोट्यातील अन्य रिक्त पदांच्या 80 टक्के जागा भरण्यात येणार आहेत. ‘गट-क’ संवर्गातील सरळसेवा भरतीची प्रक्रिया आयबीपीएस या कंपनीच्या सहकार्याने करण्यात येणार आहे. या संस्थेसमवेत भरतीबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. यानुसार वरिष्ठ लिपिक, सहायक अधिक्षक, लघुलेखक (निम्नश्रेणी) व लघुलेखक (उच्चश्रेणी) या संवर्गातील पदांच्या भरतीबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पेसा क्षेत्रातील रिक्त पदे भरणार !
राज्यातील आदिवासी क्षेत्रातील (पेसा) विविध 17 संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्याचा आदेश राज्यपाल रमेस बैस यांनी दिलेला आहे. राज्यपालांच्या या आदेशात कृषी सहायक संवर्गातील पदांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर व लातूर या विभागातील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या अखत्यारितील पेसा क्षेत्रातील पदसंख्या निश्चित करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
याबाबतच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळणे बाकी आहे. ही मान्यता न मिळाल्याने जाहिरात देता आलेली नाही. मात्र, ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितले.
राज्यात भरतीच्या घोषणा; अंमलबजावणी कधी ? उमेदवारांचा सवाल
एकीकडे विविध विभागांतील भरतीच्या घोषणा राज्य सरकारकडून होत असतानाच प्रत्येक भरती कधी होणार असा सवालही उमेदवार करत आहेत. तर दुसरीकडे शासकीय आणि निमशासकीय विभागातील लाखो पदे रिक्त आहे. त्याचा ताण देखील प्रशासकीय यंत्रणेवर येत आहे. राज्यातील वाढती बेरोजगारी हे एक मोठे संकट असताना राज्य सरकारने रिक्त जागा भरण्यासाठी पाऊले उचलण्याची गरज आहे.
हे ही वाचा :
उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत स्टाफ नर्स, मायक्रोबायोलॉजिस्ट व अन्य पदांसाठी भरती
रयत शिक्षण संस्था अंतर्गत सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे विविध पदांची भरती
GMC धुळे येथे ‘लिपिक नि टंकलेखक’ पदासाठी भरती
YIL : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज
सातारा येथे ‘अंगणवाडी मदतनीस’ पदांची नवीन भरती सुरू; आजच करा अर्ज
DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती
पुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती
महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज
UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती
RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती
पुणे येथे दिव्यांग कल्याण आयुक्तालय अंतर्गत भरती, आजच करा अर्ज
BAMU : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत 290 पदांची भरती
IB : इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 796 पदांची भरती; 23 जून 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख
अभिनंदन अर्बन को-ऑप बँक लि. अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवीधरांना नोकरीची संधी
SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 194 पदांसाठी भरती
गृह मंत्रालय अंतर्गत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज
आईक्लास अंतर्गत ‘सुरक्षा स्क्रीनर’ पदाच्या 60 जागांसाठी भरती
कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती; 4थी, 8वी, पदवी, पदव्युत्तरांना नोकरीची संधी
जालना जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पगार दरमहा 25,000 रूपये