Friday, April 26, 2024
Homeराज्यकोल्हापुर : संभाजीराजे छत्रपतींनी संताप केला व्यक्त, दोषींवर कठोर कारवाईची केली मागणी

कोल्हापुर : संभाजीराजे छत्रपतींनी संताप केला व्यक्त, दोषींवर कठोर कारवाईची केली मागणी

कोल्हापुर : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहरातील वातावरण तापलेलं आहे. सोशल मीडियावर अक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यावरून हा वाद झाल्याचं बोललं जात आहे. कोल्हापुरातील या परिस्थितीवर संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीट करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ट्वीट मध्ये त्यांनी म्हटले आहे की, शिवशाहूंच्या कोल्हापूर नगरीमध्ये औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या धर्मांध प्रवृत्तींना वेळीच चाप लावला पाहिजे. सरकारने दोषींवर कडक चार्जशीट दाखल करून इतकी कठोर कारवाई करावी, की परत औरंग्याचे उदात्तीकरण करण्याचे व सामाजिक सलोखा बिघडविण्याचे धाडस या राज्यात कुणाचे झाले नाही पाहिजे, असे म्हटले आहे.

सोशल मीडियावर अक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानंतर कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. शहरात तरुण मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले. यावेळी जमावाकडून अनेक दुकानांची, मालगाड्यांची तोडफोड करण्यात आली.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परिस्थितीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

हे ही वाचा :

शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे अनावरण

ब्रेकिंग : महाराष्ट्र हादरला! हत्येनंतर मृतदेहाचे केले तुकडे; नंतर कुकरमध्ये उकळले

नागपूर : नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज अंतर्गत भरती, आजच करा अर्ज

ICAR : सोलापूर येथील राष्ट्रीय अनार अनुसंधान केंद्र अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MITC) अंतर्गत विविध पदांची भरती

धनगर आरक्षणाचा मुद्दा कधी निकाली निघणार ? अंतिम सुनावणी “या” तारखेला; काय आहेत उच्च न्यायालयाचे निर्देश? वाचा !

तलाठी कार्यालयात काम करणारे दोन लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय