Tuesday, April 23, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडधनगर आरक्षणाचा मुद्दा कधी निकाली निघणार ? अंतिम सुनावणी "या" तारखेला; काय...

धनगर आरक्षणाचा मुद्दा कधी निकाली निघणार ? अंतिम सुनावणी “या” तारखेला; काय आहेत उच्च न्यायालयाचे निर्देश? वाचा !

मुंबई : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यासंदर्भातील धनगर आरक्षणाच्या केसवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. राज्यातील धनगर समाज ‘धनगड’ की ‘धनगर’ आहे, यावर मुंबई उच्च न्यायालयात येत्या 13, 14 आणि 20 जुलै रोजी नियमित सुनावणी (dhangar reservation latest update) होणार आहे.

धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गासोबत नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्या अशी मागणी करत चार विविध याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. या सर्व याचिकांवर एकत्रितरित्या सध्या अंतिम सुनावणी सुरू आहे. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी सुरू आहे.

धनगर समाजाला आरक्षण अनुसूचित जमाती प्रवर्गा बरोबरच नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्या अशी मागणी करत भारत अगेन्स्ट करप्शन या संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी जनहीत याचिका दाखल केली आहे. याच मुद्यावर राणी अहिल्या देवी समाज प्रबोधिनी मंच, ईश्वर ठोंबरे आणि पुरषोत्तम धाखोले यांनी तीन स्वतंत्र रिट याचिका दाखल केल्या आहेत.

मात्र, देशातील एकाही संस्थेकडे ‘धनगड’ संवर्गातील घटक राज्यात वास्तव्यास असल्याचा पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे धनगर हेच धनगड असल्याचे मुद्देसूद पुरावे सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

याबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय दाभाडे म्हणाले, धनगर केस मध्ये इंटरवेनशन करणाऱ्या खऱ्या आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी म्हणून बॉम्बे हाय कोर्टात उपस्थित होतो. आता 13, 14, 20 जुलै 2023 ह्या तारखा अंतिम सुनावणीसाठी दिल्या आहेत.

दिनांक 10, 11 व 12 एप्रिल 2023 या काळामध्ये बॉम्बे उच्च न्यायालयातील जस्टिस पटेल व जस्टिस गोखले यांच्या खंडपीठापुढे धनगर आरक्षणाची केस सुनावणी झाली होती.परंतु टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स चा अहवाल राज्य सरकारने सादर करण्याच्या संदर्भात राज्य सरकारने निर्णय घेण्याबद्दल कोर्टाने वेळ दिला होता. त्यानुसार आज दिनांक 7 जून 2023, रोजी सुनावणी ठरली होती. परंतु आज कोर्टाने सुनावणी न घेता पुढील तारीख फक्त दिली आहे.

राज्य सरकारने त्यांचे म्हणणे अद्याप दाखल केले नाही असे दिसते, अर्थात उद्यापर्यंत कोर्ट ऑर्डर डिस्प्ले झाल्यावर नेमकी परिस्थिती लक्षात येईल. आता 13 जुलै, १४ जुलै व 20 जुलै रोजी अंतिम सुनावणीसाठी हे प्रकरण पुन्हा येणार आहे. अर्थात ती सुनावणी खरंच अंतिम असेल की नाही हे मात्र सांगता येत नाही….. त्यामागे बरेच राजकारण घडत असावे…..! असल्याचे डॉ. दाभाडे म्हणाले.

परभणी येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती; 12वी, पदवी, नर्सिंग, फार्मसी, वैद्यकीय पदवीधरांना नोकरीची संधी

Indian Army : भारतीय सैन्य दलात 12वी उत्तीर्णांसाठी भरती

MUHS : नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय