Friday, March 29, 2024
Homeजिल्हातलाठी कार्यालयात काम करणारे दोन लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

तलाठी कार्यालयात काम करणारे दोन लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

पुणे : तलाठी कार्यालयात काम करणारे दोन लाचखोर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. भाऊसाहेब गिरी व संजय लगड यांना एसीबीने अटक केली आहे.तलाठ्यांना पैसे द्यावे लागतात, असे सांगून ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर एसीबीने सापळा रचून पकडले.

सविस्तर वृत्त असे की वाघोली (ता.हवेली) येथील तलाठी कार्यालयात कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांकडून लाच मागणाऱ्या दोन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. भाऊसाहेब भिकाजी गिरी (वय ५६, रा. साई बालाजी सोसायटी, आव्हाळवाडी, वाघोली, नगर रस्ता), संजय मारुती लगड (वय ५३, रा. लोहगाव) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

खरेदी केलेल्या जमिनीची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यासाठी तलाठी कार्यालयात वावरणारे दलाल भाऊसाहेब गिरी आणि संजय लगड यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. तलाठी पटांगे यांना ४५ हजार रुपये द्यावे लागतील, असे तक्रारदाराला सांगितले होते. तसेच त्यांच्या स्वतःसाठी ५ हजार रुपयांची मागणी केली होती.

त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. सापळा लावून गिरी, लगड यांना पकडले. त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक श्रीहरी पाटील आणि पथकाने ही कारवाई केली. पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले पुढील तपास करत आहेत.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय