Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याKolhapur: बिथरलेल्या भाजपकडून सूडाचे राजकारण – डॉ.उदय नारकर यांची टीका

Kolhapur: बिथरलेल्या भाजपकडून सूडाचे राजकारण – डॉ.उदय नारकर यांची टीका

Kolhapur : मोदी सरकारने जनतेच्या संभाव्य विरोधी कौलाने भयभीत होऊन अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. कॉंग्रेस पक्षाची बॅंक खाती गोठवल्याच्या पाठोपाठ केलेली ही लोकशाहीची हत्या आहे. निवडणूक रोख्यांचा घोटाळा बाहेर येताच बिथरलेल्या भाजपने केलेले सूडाचे राजकारण अगदी खालच्या थराला जाऊन पोहोचले आहे, अशी टीका भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) चे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी केली आहे.

डॉ. नारकर पुढे बोलताना म्हणाले, हा देशातील सर्व लोकशाही मानणाऱ्या लोकांना दिलेला इशारा आहे. इंडिया गटाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या दुष्ट कारवाईचा लोकशाही मार्गाने कडक निषेध करावा, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे. (Kolhapur)

तसेच लोकशाही अधिकार वापरून केजरीवाल यांच्या अटकेचा जनतेने निषेध करावा, असेही डॉ. नारकर म्हणाले.

whatsapp link

हे ही वाचा :

सर्वांत मोठी बातमी : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक

ब्रेकिंग : कॉंग्रेसची राज्यातील पहिली यादी जाहीर

जुन्नर : नाणेघाट लेणीजवळ विनापरवाना बांधकाम; 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

राज ठाकरे यांना महायुतीत घेतल्याने काहीही फरक पडणार नाही – रामदास आठवले

मोठी बातमी : राज्यातील ‘या’ भागात भुकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शिरूर लोकसभा मतदारसंघात “या” दोन उमेदवारांमध्ये सामना जवळपास निश्चित

संबंधित लेख

लोकप्रिय