Manchar : मंचर प्रांत कार्यालय येथे सुरु असलेल्या आदिवास बांधवांच्या उपोषणास किसान सभेने उपस्थित राहत जाहीर पाठींबा दिला आहे. तसेच आदिवासींवर झालेला अन्याय दूर करा, अशी मागणी किसान सभेने केली आहे.
जुन्नर तालुक्यातील नारायणगड गावाच्या परिसरात आदिवासी बांधव राहत होते व शेतजमीन कसत होते. तेथे वनविभागाने त्यांना त्यांच्या शेती, घरे यापासून बेदखल केले आहे. तसेच पाणी पिण्यासाठी स्वखर्चाने खोदलेल्या विहीर बुजवून टाकली. वनविभागाच्या या कारवाईमुळे बेघर झालेल्या आदिवासीना न्याय मिळावा यासाठी उपविभागीय कार्यालय, मंचर येथे बेमुदत उपोषण सुरु आहे.
त्या उपोषणाला अखिल भारतीय किसान सभा पुणे जिल्हा समितीच्या वतीने पाठींबा देण्यात आला व उपोषणकर्ते यांच्या मागण्या त्वरित सोडवाव्यात यासाठी प्रांत कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. (Manchar)
पुणे जिल्हा किसान सभेचे उपाध्यक्ष राजू घोडे, आंबेगाव तालुका कार्यकारणी सदस्य अर्जुन काळे, बाळकृष्ण गवारी इ. उपस्थित होते.


हे ही वाचा :
मोठी बातमी : सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँकेला पुन्हा धरले धारेवर
अजमेर मध्ये रेल्वेचा भीषण अपघात, ४ डबे रुळावरून घसरले रुळही उखडले
मोठी बातमी : कोल्हापुरात भीषण अपघात ट्रकने ४ मजुरांना चिरडले तर ८ गंभीर जखमी
मी पुन्हा आलो पण येताना दोन्ही पक्ष फोडूनच आलो देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य