Wednesday, May 8, 2024
Homeलोकसभा २०२४KHOPOLI : खासदारांनी दहा वर्षांत घाटाखाली दुर्लक्ष केले : हमीद शेख

KHOPOLI : खासदारांनी दहा वर्षांत घाटाखाली दुर्लक्ष केले : हमीद शेख

उमेदवार संजोग वाघेरेंचा खोपोलीत पदयात्रा काढून महाविकास आघाडीकडून प्रचार Khopoli

खोपोली : विद्यमान खासदारांनी घाटाखाली दहा वर्षे दुर्लक्ष केले. त्यांनी या भागांत विकासकामे केली नाहीत. दहा वर्षे कोठे गायब झाले होते माहित नाही. आता त्यांना कायमचे घरी बसविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, अशी संतप्त भावना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार‌) पक्षाचे संपर्कप्रमुख हमीद शेख यांनी व्यक्त केली.

महाविकास आघाडीचे व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील (Sanjog Waghere Patil) यांच्या प्रचारार्थ खोपोली परिसरात पदयात्रा काढण्यात आली. त्यात महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. khopoli news

डोक्यावर टोपी, गळ्यात उपरणे, हातात “मशाल” चिन्ह घेतलेले कार्यकर्ते संजोग वाघेरे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणा देत होते. खोपोली (KHOPOLI) परिसरात ही पदयात्रा काढण्यात आली.

या पदयात्रेत हमीद शेख म्हणाले की, खासदारांनी कोणतीही कामे केलेली नाहीत. ते दहा वर्षात कधी इकडे दिसलेच नाहीत. नागरिकांमध्ये त्यांच्याबाबत तीव्र भावना आहेत. खोपोली परिसरातील या पहिल्याच पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या पदयात्रेनिमित्ताने मी ग्वाही देतो की, संजोग वाघेरे पाटील यांचा विजय पक्का आहे. तसा निर्णय सर्व स्तरातील मतदारांनी घेतलेला आहे. khopoli news

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

प्रकाश आंबेडकरांचा खळबळजणक दावा, दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे…

ब्रेकिंग : शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर, वाचा किती दिवस असणार सुट्ट्या !

अजितदादांच्या राष्ट्रवादीला चारच जागा मिळतात ही शोकांतिका डॉ. अमोल कोल्हेंचा टोला

मोठी बातमी : पुण्यातील तिरंगी लढतीत आता पंतप्रधान मोदींची होणार जाहीर सभा

अनधिकृत जाहिरात फलकावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल

निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित

अखेर “त्या” प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण

कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे

युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय