Sunday, May 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : शिक्षण हीच यशाची गुरुकिल्ली - डॉ. संजय तलबार

PCMC : शिक्षण हीच यशाची गुरुकिल्ली – डॉ. संजय तलबार

पीसीसीओईआर मध्ये राज्यस्तरीय ‘टेक्नोवेट-२०२४’ स्पर्धा संपन्न PCMC

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : आजच्या स्पर्धात्मक जगात, विद्यार्थ्यांनी प्रगत शिक्षणावर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व मशीन लर्निंग सारख्या साधनांच्या वापरावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. उच्च तंत्रज्ञानामुळे साधने कितीही वाढली, विकसित झाली तरी निरंतर शिक्षण हीच यशाची गुरुकिल्ली आहे असे मत डॉ. संजय तलबार यांनी व्यक्त केले. pcmc news

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्च (PCCOER) मध्ये ‘टेक्नोवेट-२०२४’ या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

टेक्नोवेट २०२४ मध्ये विविध तंत्रज्ञानावर आधारित बीजीएमआय-व्हॅलोरंट, कॅड ओ क्रिएट, फास्ट अँड फ्यूरियस, आयपीएल लिलाव, एम यू एन, शार्क टॅंक, टेक-संगम एस्केप रूम, ब्रो कोड, ट्रेझर हंट अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयांतील ५०० हून अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. याचा बक्षीस वितरण समारंभ संजय तलबार यांच्या हस्ते पार पडला. pcmc news

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. pcmc news

प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी स्वागत केले. डॉ. सुशांत वाघमारे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. संतोष रणदिवे आणि डॉ. सुशांत वाघमारे यांनी केले.कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व विविध संस्थांचे विद्यार्थी उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

प्रकाश आंबेडकरांचा खळबळजणक दावा, दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे…

ब्रेकिंग : शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर, वाचा किती दिवस असणार सुट्ट्या !

अजितदादांच्या राष्ट्रवादीला चारच जागा मिळतात ही शोकांतिका डॉ. अमोल कोल्हेंचा टोला

मोठी बातमी : पुण्यातील तिरंगी लढतीत आता पंतप्रधान मोदींची होणार जाहीर सभा

अनधिकृत जाहिरात फलकावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल

निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित

अखेर “त्या” प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण

कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे

युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय