Sunday, May 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांच्याकडून शहरातील उद्यानांची पाहणी

PCMC : अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांच्याकडून शहरातील उद्यानांची पाहणी

देखभाल, दुरुस्तीच्या कर्मचाऱ्यांना सूचना

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड शहरातील (pcmc) नागरिकांचे जीवनमान सुधारून त्यांना उत्तम सोयी सुविधा देण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभाग प्रामुख्याने प्रयत्नशील आहे. शहरातील उद्यानांमध्ये नागरिकांना सर्व सुविधा देण्यासाठी महापालिका प्रशासन (pcmc) आघाडीवर असून त्यासाठी महापालिकेने पी सी एम सी दक्ष नावाचे ॲप्लिकेशन तयार केले आहे.

सदर ॲप्लिकेशनच्या माध्यमातून उद्यानातील प्रत्येक कामावर लक्ष ठेवण्यात येत असून कर्मचाऱ्यांना ॲप्लिकेशनच्या माध्यमातून दैनंदिन कामाचे वाटप सुद्धा केले जात आहे. यामुळे संबंधित ठेकेदार यांच्याकडून काम पूर्ण न झाल्यास ठेकेदारास प्रतिदिन दंड सुद्धा आकारण्यात येत आहे. pcmc news

याच अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी शहरातील विविध उद्यानास भेटी दिल्या. यामध्ये ड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत वाकड येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यान, पिंपळे निलख येथील कै. प्रभाकर साठे उद्यान, शहीद अशोक कामठे उद्यान, या उद्यानांचा समावेश होता.

या पाहणीदरम्यान उपआयुक्त रविकिरण घोडके, सहाय्यक उद्यान अधिक्षक राजेश वसावे तसेच स्थापत्य आणि उद्यान विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी उद्यानांची पाहणी करून विविध दुरुस्तीबाबत सूचना दिल्या. pcmc news

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी उद्यानांच्या मुख्य गेट समोरील साफसफाई करून गेट समोर पार्किंग करण्यासाठी प्रतिबंध घालावा, ओपन जिमच्या कडेने सुगंधित रोपांची व बांबूच्या झाडांच्या लागवड करावी, फुटपाथच्या बाजूने वडेलिया / पंपास ग्रास / कामिनी / डूराटा / माल्फेजिया वृक्षांची लागवड करावी, सीमा भिंतीलगत बांबूच्या झाडांची लागवड करावी तसेच उद्यानातील बॉक्समध्ये एकाच जातींच्या वृक्षांची लागवड करावी, उद्यानामध्ये साफसफाई ठेऊन नागरिकांना अडथळा होणार नाही किंवा अडचणी येणार नाही अशा पद्धतीने उद्यानांची देखभाल दुरुस्ती करावी इ. सुचना दिल्या.

उद्यानातील कामांवर ॲप्लिकेशनच्या माध्यमातून राहणार लक्ष

शहरातील उद्यानांमध्ये नागरिकांना उत्कृष्ट सेवा मिळाव्यात यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. पीसीएमसी दक्ष ॲप्लिकेशनच्या माध्यमातून उद्यानातील कामांवर लक्ष ठेवण्यात येणार असून कर्मचारी, ठेकेदार यांनी कामामध्ये हलगर्जीपणा करू नये.

प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

प्रकाश आंबेडकरांचा खळबळजणक दावा, दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे…

ब्रेकिंग : शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर, वाचा किती दिवस असणार सुट्ट्या !

अजितदादांच्या राष्ट्रवादीला चारच जागा मिळतात ही शोकांतिका डॉ. अमोल कोल्हेंचा टोला

मोठी बातमी : पुण्यातील तिरंगी लढतीत आता पंतप्रधान मोदींची होणार जाहीर सभा

अनधिकृत जाहिरात फलकावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल

निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित

अखेर “त्या” प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण

कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे

युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय